TOGETHER FOR NASHIK
नाशिक औद्योगिक विकासात अग्रेसर
नाशिकचा सर्चच क्षेत्रातील विकास वेगाने आणि आधुनिकतेने होतो आहे. याचाच एक भाग म्हणजे नाशिकमधील औद्योगिकीकरण. नाशकात सध्या ‘इंडोएक्स्पो’ नावाचे औद्योगिक प्रदर्शन सुरू आहे. या उद्योगास लागणारे विविध तंत्रज्ञान व मशीनरी उद्योजकांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. अत्यंत वैशिष्ठपूर्ण प्रकारची उत्पादने यात आहेत. त्याचबरोबर नामांकित कंपन्यांचे उपकरणांचे प्रात्यक्षिक बघता येणार आहे. इंडस्ट्रीअल ऑटामेशन्स, मशिन टुल्स, बिअरींग स्विचगिअर, गिअर्स व पंप, वेल्डींग उपकरण, फार्मा मशीनरीज, मटेरिअल्स, हेंडलिंग अशा अनेक उपकरणांची माहिती व प्रात्यक्षिक उत्पादकांना मिळणार आहे.
देशातील एक्साइज इंडिया, बॉश फेरोबिझनेस टेक्नॉलॉजी अशा व अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत. औद्योगिकीकरणामुळे देशाच्या प्रगतीला दिशा मिळाली आहे. त्यातूनच नाशिकचे उद्योगक्षेत्र जगाच्या नकाशावर आपले वेगळेपण टिकवून आहे. अनेक रोजगार यामुळे उपलब्ध झाले आहेत. आणि नाशिकची आर्थिक उलाढालही वेगाने वाढली आहे. अनेक प्रमुख उत्पादनांची निर्यात जगभर नाशिकमधून होत आहे. अनेक नवे तरूण पिढीतील उद्योजक प्रयोगशील जाणिवेतून उद्योग उभारत आहेत व विकासात आपले योगदान देत आहेत. नाशिकमधील परिसरातील इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थीही संशोधनाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्राला गती देत आहेत. म्हणूनच औद्योगिक विकासात नाशिक अग्रेसर होत राहिल.
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
No comments:
Post a Comment