TOGETHER FOR NASHIK
नाशिकचे पर्यावरण रक्षण
हरीत नाशिक ही संकल्पना रूजवण्यासाठी सर्व नाशिककर एकत्र आले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या चळवळीचा हा एक भाग आहे. नाशिक व परिसरात झाडांच्या व डोंगरांच्या रांगा आहेत. त्यामुळेच दिवसेंदिवस पर्यटकांना नाशिकचे आकर्षण वाटते. जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधून ‘नमामि गोदा फाऊंडेशन’ व ‘‘नाशिकची आई गोदामाई’ या संस्थांच्या वतीने नंदिनी नदी किनार्याजवळ वृक्षारोपण करून परिसर निसर्गरम्य करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्याचबरोबर परिसर स्वच्छ ठेवण्याचाही संकल्प केला.
नाशिक शहरातून वाहणार्या नंदिनीला आजकाल नद्यांचे स्वरूप आले आहे. त्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली आहे. या सामाजिक संस्थांनी केलेल्या प्रयत्नांतून नंदिनीला पुर्नवैभव प्राप्त होण्यास निश्चित मदत होईल.
पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणाबरोबरच श्रमदानातून इथले रूप पालटणार आहे. झाडे लावण्याबरोबरच ती जगवली पाहिजेत व त्यातूनच आपले आरोग्य चांगले राहिल निरोगी राहील. हा विचार यामागे आहे. नाशिक महानगरात वेगळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम निश्चितच दिशादर्शक आहेत. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
No comments:
Post a Comment