मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK
नाशिक व प्लास्टिक मुक्ती
प्लास्टिक मुक्ती हा आज महत्त्वाचा मुद्दा आहे. पर्यावरण संतुलन आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध संस्थांनी, पुढाकार घेतला आहे आणि जनजागृती करत आहेत. याचाच एक भाग म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘टाकाऊतून टिकाऊ’ या उपक्रमातून दैनंदिन वापरासाठी लागणार्या कागदी पिशव्या पाकिटे बनवून ते विक्रीसाठी आणण्याचा संकल्प पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर केला आहे. बचतगट चालविणार्या महिलांना कागदापासून पिशव्या, पाकीटे बनविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित केले आहे आणि त्यातून अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. पर्यावरण संतुलनासाठी समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत विचार पोहोचवणे गरजेचे आहे. पण त्यासाठी कृतीशीलता महत्त्वाची आहे. तोच विचार मुक्त विद्यापीठाने जोपासला आहे.
‘स्वच्छ नाशिक-सुंदर नाशिक’ ही संकल्पना खर्या अर्थाने रूजवण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम निश्चितच मार्गदर्शक आहेत. नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत कागदापासून तयार केलेल्या वस्तूंचे मार्केटींग केल्यास महिलांना आर्थिक लाभ मिळू शकतात आणि त्यांचे जीवनमानही सुधारण्यास मदत होईल. बाजार समितीत फळे विक्रीसाठी भाजीपाला विक्रीतही कागदी पिशव्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. अशा अनेक उपयोगांसाठी हा उद्योग भरभराटीस येऊ शकतो व विचारही पोहोचू शकतो.
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
No comments:
Post a Comment