मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK
गोदावरीचे संवर्धन
(विश्वास जयदेव ठाकूर)
गोदावरीचे पावित्र्य आणि शुद्धता राखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना केली जात आहे. अनेक सामाजिक संस्थांनी यात पुढाकार घेतला असून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनप्रबोधन केले जात आहे. गोदावरीला पुर्नवैभव मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. नुकतीच गोदावरीच्या संवर्धनाबाबतीत काम करण्यासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, ओरीसा, कर्नाटक, पाँडेचेरी या सात राज्यातील ज्येष्ठ सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी, अभ्यासक चळवळीतील कार्यकर्ते एकत्र आले आहेत. आणि संवर्धनाचा निर्धार केला आहे.
पर्यावरणाचा समतोल ही आज महत्वाची समस्या ठरली आहे. त्यावर निश्चित उपाय शोधणे सर्वांची जबाबदारी आहे. नुसतेच आंदोलने करणे हा यावर उपाय नसून, विविध क्षेत्रातील तज्ञांनी एकत्र येऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग करणे, यासाठी उपयुक्त ठरेल. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी यासाठी शालेय पातळीवर अभ्यासक्रम तयार करणे तसेच पथनाट्यांच्या माध्यमातून लोकप्रबोधन करणे प्रभावी मार्ग ठरेल. लोकप्रतिनिधींनी यासाठी जाणीवपूर्वक पुढाकार घेऊन गोदावरी स्वच्छतेचा विचार सर्वापर्यंत नेणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पातळीवर यासाठी एकसंघ जाणीवेतून ही चळवळ निश्चित योग्य दिशा देईल.
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
No comments:
Post a Comment