Friday, 29 March 2019

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

विना हेल्मेट प्रवास, मृत्यूला निमंत्रण


हेल्मेट वापरणे ही खरं तर मूलभूत गरज ठरली आहे. वाहतूक सुरक्षा ही स्व:सुरक्षेशी निगडीत गोष्ट आहे. याचा कोणी विचारच करत नाही. नुकत्याच पोलीस खात्याकडून आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन महिन्यात सुमारे 28 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यात 25 लोकांनी हेल्मेट घातलेले नव्हते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि चारचाकी अपघातातील तिघांनी सीटबेल्ट लावलेला नव्हता.
तसेच 18 ते 80 वयोगटातील तरूण हे हेल्मेटसक्ती असतांनाही विनाहेल्मेट वाहन चालवतांना जीव धोक्यात घालत आहेत. 
नाशिक शहराचा वाढता विस्तार, वाढती वाहनांची संख्या अति वेग आणि वाहतुक नियमांचे उल्लंघन ही काही कारणे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. 
पोलीस विभागकडून वाहतूक नियमांविषयी प्रबोधनपर जनजागृती होऊनही अपघात रोखण्यास फार यश आले असे म्हणता येणार नाही. शालेय पातळी पासून ते महाविद्यालयीन पातळीपर्यंत अनेक प्रकारे जनप्रबोधनाची चळवळ अधिक वेगाने करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे आणि त्यात स्वयंशिस्त व सुरक्षा यांचा मेळ घालून संदेश देणे महत्त्वाचे ठरेल.

(विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

अवकाश झेप व माणूसपणाची जाणीव


अवकाश झेप व माणूसपणाची जाणीव

भारताने काल इतिहास घडवला अवकाशात शत्रुचा कृत्रिम उपग्रह नष्ट करण्याची क्षमता भारताने मिळवली आहे. डी.आर.डी.ओ. ने तयार केलेल्या अटी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेऊन भारत अवकाशात जगातील चौथी महाशक्ती ठरला आहे. भारताची विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील ही झेप अविस्मरणीय आहे.

विज्ञान माहिती तंत्रज्ञानातील भारताची प्रगती आश्‍चर्यकारक आणि मान उंचावणारी आहे. भारतातील तरूण उद्योगधंदे, नोकरीच्या निमित्ताने जगभरात नाव कमवत आहेत, देशाचे नाव उज्वल करत आहेत. मूलभूत अभ्यासाची तयारी आणि मेहनत यातून अनेक तरूण देशविकासात हातभार लावत आहेत. संपन्न संस्कृतीचा वारसा घेऊन भारताची प्रगती विधायकतेकडे जात आहे. हा विचार इथे महत्त्वाचा ठरावा. विविध क्षेत्रातील माणसाची प्रगती ही नव्या संशोधनातील जाणीवांना कवेत घेणारी आहे हे जाणून घेऊन त्यचा विधायक वापर प्रत्येकाने करावा. विकासाची उंचावणारी झेप, माणूसकी व मातीशी नातं टिकवून ठेवणं हेही प्रत्येकाची जबाबदारी असली पाहिजे हेही महत्त्वाचे ठरावे. 

(विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष

विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Friday, 22 March 2019

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

दिव्यांग बांधवांच्या मतदान हक्कांसाठी...


निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. प्रचार मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे. मतदानाचा हक्क सर्व घटकांना प्राप्त होण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. त्यासाठी नवनवीन योजनाही राबवत आहे. 

सर्वांनी मतदान करावे म्हणून विविध वृत्तपत्रे, चॅनेल्सवरून आवाहन करण्यात येत आहे. यात एका महत्त्वपूर्ण घटनेकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. ती म्हणजे दिव्यांग बांधवांना मतदान करण्यासाठी घरपोच गाड्या, वाहनांची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यांच्यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर, पाणी व मदतनीसाची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे दिव्यांग बांधवांना मतदान करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

अनेक वर्षे आपल्या शारीरिक अडचणींमुळे, सुविधा नसल्यामुळे ते मतदानापासून वंचित राहत होते. यामुळे मतदानाचा टक्का निश्‍चितच वाढणार आहे. समाजात दिव्यांग बांधवांच्या प्रश्‍नांसाठी जागृती झाली आहे. अनेक सामाजिक संस्था त्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी पुढे आल्या आहेत आणि त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे हे दिलासा देणारे आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये मी निवडणूक आयुक्तांना विनंतीपत्र लिहून सोयी-सुविधांबाबत मागणी केली होती. त्याला आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देऊन सुविधा दिल्या आहेत हे निश्‍चितच सर्वसामान्यांचे बळ वाढवणारे आहे. दिव्यांग बांधवांसाठी आणखी त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. 

विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष

विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Friday, 8 March 2019

महिला सबलीकरण किती जवळ? किती दूर?

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

महिला सबलीकरण किती जवळ? किती दूर?


8 मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे महत्त्व लक्षात घेता जगभर महिलांनी केलेल्या प्रगती संदर्भातील विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. भारतात ग्रामीण भागात महिलांना याविषयीची क्वचितच माहिती असावी. इतकेच नव्हे तर शिक्षित महिलांनादेखील याबाबत काही जास्त माहिती असेलच असे नाही. सरकारी यंत्रणा तसेच काही संस्था व संघटनांच्या दृष्टीने या दिवसास महत्त्व असू शकते परंतु या दिवसाचा महिलांना काही लाभ झाला आहे की नाही? कर्तृत्ववान महिलांच्या प्रगती अथवा त्यांच्या उपलब्धीचा गौरव होतो, लक्ष केंद्रीत होते परंतु बाकी सदासर्वदा महिलांमधील असमानताच निदर्शनास येते. यातून खरोखर त्यांचा विकास साधला जातो का?
भारतात महिलांना अधिकार मिळावेत यादृष्टीने तसेच त्यांच्या सबलीकरणाचे कार्य तसे बरेच अगोदरपासून सुरू झालेले असून या कार्यात राजा राममोहन रॉय, केशवचंद्र सेन, इश्‍वरचंद्र विद्यासागर तसेच स्वामी विवेकानंद अशा महापुरुषांचा मोठा सहभाग होता त्यांच्या प्रयत्नातून महिलांमध्ये अन्याया विरुद्ध लढण्याची क्षमता निर्माण होण्यास प्रारंभ झाला. त्यांनी केलेल्या कार्यास पुढे नेण्यासाठी काळानुरूप आणखी नेते पुढे आले तसेच समाजसेवी संस्था पुढे येऊन कार्य पुढे चालविले गेले. हे जरी होत गेले असले आणि महिला सबलीकरणाच्या दृष्टीने समाज जागृत असल्याचे दिसले. यादृष्टीने मोठमोठी कार्य होत असल्याचे दिसत असले तरी वस्तुस्थिती ही प्रत्यक्षात वेगळी दिसत आहे. भ्रुणहत्या, घरगुती हिंसा, बालविवाह यासारख्या घटनांना आळा घालण्याच्यादृष्टीने भक्कम पाऊले उचलू शकलो नाहीत, याबाबतीत सक्षम होऊ शकलो नाहीत. हुंडाबंदी कायद्याने जरी असली तरी यातील महिलांचा छळ, अडवणूक, मानसिक व शारीरिक छळाच्या घटना कमी होऊ शकल्या नाहीत. यावरून महिलांची स्थिती समाधानकारक नाही असे लक्षात येते.

जोपर्यंत पुरुष वर्ग महिलांकडे सन्मानाने पहात नाही, आपली मानसिकता, दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत महिलांच्या स्थितीत बदल होणे शक्य नाही.  खरे तर प्रत्येक दिवस हा महिला दिवस व्हावयास हवा जिथे महिलांचा सन्मान अबाधित राहील.

विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष

विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur