Tuesday, 24 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
‘नाशिकच्या सौंदर्यासाठी’
नाशिकमध्ये वसुंधरा दिनाचे औचित्य साधून अभिनव अशा वृक्ष रेखाटनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. रत्ना भार्गवे ह्या चित्रकार आहेत. निसर्ग हा माणसाचा मित्र आहे. निसर्गाकडे
पाहणे त्याला समजून घेणे हा खरा अनुभव असतो.
पर्यावरणाचा समतोल आणि संतुलन राखण्यासाठी झाडे हा महत्त्वाचा घटक आहे. निसर्गाकडे चला हा संदेश मानवी जगण्याच्या आत्मशांतीचा नवा मार्ग आहे. यासाठी झाडे लावणे हा महत्त्वाचा मार्ग आहे. नाशिक जिल्हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. उंच-उंच डोंगर रांगा आणि पर्यटकांसाठी नवी पर्यटनस्थळे हे नाशिकच्या विकासाला दिशा देणारे महत्त्वाचे घटक आहेत.
‘हरीत नाशिक-सुंदर नाशिक’ ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी निसर्गाचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येक नागरीकाची जबाबदारी आहे. शाळा, महाविद्यालये येथे जाऊन वृक्षारोपण करणे व त्यांचे भविष्यातील फायदे, वैज्ञानिक उपयोग समजावून सांगणे गरजेचे आहे. नाशिकच्या सौंदर्यात त्यामुळे भर  पडणार आहे. यातून निश्‍चितच हरीत नाशिकच्या कार्याला बळ मिळण्यास मदत होईल. जागतिक उष्ण तापमानात होणारी जलद वाढ हवामान आणि ऋतुबदलांच्या जैवसृष्टीची स्थिरता ठेवण्यासाठी वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज आहे. वृक्ष लागवडीतून औषधोपयोगी झाडांची लागवड व्यावसायिक उत्पन्नासाठी पूरक ठरणार आहे. प्रयोगशील जाणिवेतून पडिक जमिनीवर वृक्ष लागवड केल्यास नाशिकचे सौंदर्य वाढेल व सुंदर नाशिकचे स्वप्न साकार होईल.


विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Saturday, 21 April 2018

TOGETHER FOR NASHIK

‘नाशिकच्या उद्योगक्षेत्राची नवी झेप’


वेगाने विकसित होणार्‍या नाशिकच्या उद्योगक्षेत्राने मोठी आघाडी घेतली आहे. देशातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प नाशिकमध्ये स्थिरावले आहेत व अनेक रोजगारही उपलब्ध झाले आहेत. अनेक रोजगारही उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे नाशिकची औद्योगिक झेप प्रगतीशीलतेकडे होत आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणजे देशामध्ये पहिल्यांदाच कोल्ड रोलिंगपासून कोल्ड ग्रेन ओरीएंटेड इलेक्ट्रीकल स्टीलचे उत्पादन नाशिकमधून करण्यात येणार आहे. देशात वर्षाकाठी सुमारे चार लाख टन सीआरजीओ स्टीलची मागणी आहे. पण या ग्रेडचे स्टील भारतामध्ये अद्याप उत्पादित होत नव्हते. आता थिसेनकृ्रपच्या नाशिकमधील प्रकल्पात अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने स्टील निर्मितीला सुरूवात झाली आहे. ही कंपनी आता वर्षाकाठी 35 हजार टन सीआरजीओ स्टील निर्माण करणार आहे. हे उत्पादन भारतातील एकमेव आहे.
मेट्रो सिटीकडे होणारी नाशिकची वाटचाल औद्योगिक क्रांतीकडे, नव्या युगाकडे नेणारी आहे.     असे नव-नवे प्रकल्प नाशिकच्या नावलौकीक वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहेत. थिसेनक्रुप या कंपनीने ह्या उत्पादनाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असतांना नशिक शेती आणि सेवा क्षेत्राबरोबरच उद्योगाला अनुकूल आहे याचे हे सुचिन्ह म्हणावे लागेल. स्टील उत्पादनाच्या बाबतीत भारताचे स्थान पाचव्या ते सहाव्या क्रमांकावर आहे. पण आता यामुळे भारताची नोंद जागतिक स्तरावर झाली आहे हे उद्योगक्षेत्राला बळ आणि आत्मविश्वास देणारे आहे.


विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Thursday, 19 April 2018

TOGETHER FOR NASHIK
‘नाशिकची कलापरंपरा’

मूक चित्रपटाचे नायक भाऊराव दातार यांनी मराठी चित्रपट सृष्टीला मोठे योगदान दिले आहे. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेल्या त्यांच्या 60 चित्रपटांमध्ये भाऊराव विविध भूमिकेत होते. अष्टपैलू अभिनय व राजबिंडे रूप यामुळे चित्रपटसृष्टीत भाऊरावांचा दबदबा होता. नानासाहेब सरपोतदार, मास्टर विनायक आणि भालजी पेंढारकर यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत त्यांनी मूक व बोलपटांमध्ये काम केले. प्रतिभावंत अभिनेते म्हणून त्यांनी ख्याती निर्माण केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नाशिक तर्फे भाऊरावांच्या जीवन व कला प्रवासाचा वेध घेणारा ‘भाऊराव दातार-अ कर्टन कॉल’ नावाचा लघुपट दाखवण्यात आला. त्यांचे नातू सुप्रसिद्ध चित्रपट अभ्यासक भरत कान्हेरे यांनी ह्या लघुपटाचे संशोधन व दिग्दर्शन केले होते.
भाऊरावांचे वडील नाशकात व्यवसायानिमित्ताने आले आणि त्यांना व्यवसायात मदत करतांनाच मास्टर दिनानाथ व बालगंधर्व अशा दिग्गज कलावंताचा त्यांनी अभिनय बघितला. आणि अभिनय करण्याचे ठरवले. त्यातून त्यांची वाटचाल बहरत गेली. भाऊरावांनी आजपर्यंत 119 चित्रपटांमध्ये योगदान दिले.
नाशिकच्या कलापरंपरेचा संपन्न वारसा आहे. चित्रपट व्यवसायाची मूहुर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके यांच्या तालमीत अनेक कलावंत तयार झाले. त्यातीलच एक भाऊराव होते. त्यांनी पडद्यावर साकारलेल्या शिवाजी महाराजांच्या भूमिका अजूनही रसिकांच्या स्मरणात आहेत.

आज नाशिकचे अनेक कलावंत आपल्या नाशिकचे नाव उज्ज्वल करत आहेत. त्यांना अशा महान कलावंतांच्या कार्याची शिदोरी परंपरेने आली आहे. त्याची सर्वांनी जोपासना करावी व कलाक्षेत्राला योगदान द्यावे. 


विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Wednesday, 18 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
‘नाशिकचा विकास व तरूण संशोधक’

नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या तृतीय वर्षे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर बॅटरी चार्ज करून धावणारी इलेक्ट्रीक मोटर तयार केली. हे विद्यार्थी नाशिकमधील आहेत. तरूणांमधील संशोधन वृत्ती आणि त्यांना असलेले सामाजिक भान यातून व्यक्त होते. आज नाशिकचा चहूबाजूंनी वेगाने विस्तार होत आहे. पर्यावरण, वाहतूकीच्या समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर तरूणांनी केलेल्या संशोधनाला विशेष महत्त्व आहे.
प्रदुषणमुक्त नाशिकसाठी सौर उर्जेवर चालणारी वाहने उपयुक्त आहेत.त्यातून पर्यावरणाविषयी प्रबोधन होण्यास मदत होईल.
आज नाशिक शहरात आर्कीटेक्चर, कृषी, फार्मसी, इंजिनिअरींग अशी नामांकीत कॉलेजेस सुरू झाली आहेत. त्यातून अनेक विद्यार्थी प्रयोगशील अभ्यासूवृत्तीने ज्ञानसाधना करत आहेत. त्यातील वास्तूशास्त्राचे विद्यार्थी नाशिक शहराची रचना सुंदर असावी यासाठी प्रयोग करत आहेत व प्रतिकृती प्रदर्शनातून मांडत असतात. कृषी महाविद्यालयांचे विद्यार्थी नवनवीन पिकांचे उत्पन्न  शेतकर्‍याला कसा आर्थिक लाभ मिळवून देतील याबाबत माहिती देत असतात.

नाशिकचा सर्वच क्षेत्रात विकास होण्याच्या दृष्टीने अनेकांचा हातभार लागत आहे त्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Monday, 16 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
‘महामानवाचे विचार व हरीत नाशिक’

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा, बंधुत्वाचा संदेश दिला. लोकशाही, मूलभूत हक्क यांविषयी विचार मांडले, नवी दृष्टी दिली. याच बरोबर डॉ. आंबेडकरांना कृषी व्यवस्थेची उत्तम जाण होती. सामूहिक शेतीचे ते पुरस्कर्ते होते. ग्रामीण भागात विखुरलेला समाज एकसंध करायचा तर शेती व्यवसायाचं चित्र बदललं पाहिजे. याबाबत ते आग्रही होते. शेती हा ग्रामीण भागातील आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू आहे. अनेकांना ते रोजगाराचे माध्यम आहे. त्यामुळे शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन हा उद्योग म्हणून असला पाहिजे. ही त्यांची ठाम धारणा होती. इतक्या दूरदृष्टीने व सखोलतेने त्यांनी शेतीकडे बघितले. सर्वसामान्यांच्या विकासाकडे ते कायमच आपुलकीने आस्थेने बघत. हे सांगण्याचे कारण की डॉ. बाबासाहेब जयंतीनिमित्त दिंडोरी रोडवरील गोरक्षनगर मित्र मंडळाने एक अभिनव उपक्रम केला. डी.जे.ला मिरवणूकीला दूर सारत नवा आदर्श दिला. तेथील कार्यकर्त्यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला व वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. 

डॉ. बाबासाहेबांच्या कृषी विषयक विचारांना कृतीशीलतेने जपण्याचाच हा उपक्रम आहे. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आज नाशिकसारख्या महानगरात प्रदुषणाने विळखा घालायला सुरूवात केली आहे. वाढते औद्योगिकरण, वाहतूक यामुळे प्रदुषणात वाढ होत आहे. यासाठी महामानवाच्या विचारातून विकासाला नवी दिशा मिळू शकते हा वस्तुपाठ यातून समोर आला आहे. ‘सुंदर नाशिक-हरीत नाशिक’ या संकल्पनेला यातून बळ मिळेल. हा आदर्श सर्व नाशिककरांनी घ्यावा.


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Friday, 13 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
‘नाशिकमध्ये रुग्णांसाठी मायेचा आधार’

आजकाल अनेक कुटुंबांना दारिद्रयामुळे आरोग्य विषयक उपचारांचा खर्च परवडत नाही. यासाठी अनेक सेवाभावी संस्था हातभार लावत असतात व रुग्णसेवा करत असतात. याच जाणिवेतून नाशिकच्या ‘इंडीयन मेडीकल असोसिएशन, नाशिक’ने पुढचे पाऊल उचचले आहे. कर्करोगासह दुर्धर आजारातून रुग्णांची देखभाल करण्यासाठी ‘हॉसपीस’ ही संकल्पना राबविण्याचे ठरले आहे. रुग्णांना मानसिक आधार देण्याचे काम यातून होणार आहे.
दुर्धर रोगाने पिडीत रुग्ण अखेरच्या काळात वेदना सहन करत असतात. उपचार करण्यासारखे काही नसल्याने रुग्णालयात ठेवण्याचा खर्च परवडणारा नसतो, हे लक्षात घेऊन ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मानवतेच्या दृष्टीने हे अत्यंत स्वागतार्ह पाऊल आहे. नाशिकमध्ये रुग्णांसाठी प्रेमाने, तळमळीने संस्था अविरतपणे हे काम करत आहेत. ज्येष्ठ नागरीक, दारीद्रयाने पिडीत अनेक रुग्णांना मदतीची गरज असते. त्यांना अशा संस्था मदतीचा हात देतात. संवेदनशाीलता व माणूसकीच्या भावनेने हे काम करतात. 
दिंडोरी रोड येथे क्षयरोगांच्या रुग्णांसाठी टीबी सॅनीटोरीयमद्वारे सेवा पुरविली जाते. रुग्णाला उपचाराबरोबरच संवादाची गरज असते आणि त्यातून त्याची इच्छाशक्ती प्रबळ होत असते. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे व्रत घेणार्‍या संस्था समाजासाठी आदर्श आहेत.

अशा संस्थांची संख्या वाढण्याची गरज असून त्यातून आपुलकीचा, माणूसकीचा कृतीशील संदेश जनतेपर्यंत पोहोचेल.   


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur