Friday, 19 October 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

जगण्याचा आशय समजून घ्यायचा असेल तर?

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात येते. जगण्याचा आशय शोधून देण्याचे काम पुस्तके करतात. पुस्तकांच्या मैत्रीची शिदोरी आयुष्यभर पुरणारी असते. यानिमित्ताने नाशिकमध्ये अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये या दिनांचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आजच्या व्हर्च्युअल जगात पुस्तकांशी असलेलं नातं अधिकाधिक घट्ट होण्यासाठी ‘वाचन प्रेरणा दिना’सारखे  उपक्रम महत्त्वाचे आहेत. यातून वाचन संस्कृतीच्या विकासाला निश्‍चितच हातभार लागेल. नाशकात अनेक ग्रंथालये आहेत. त्यांना त्यांचे वेगळेपण आहे, परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण सार्वजनिक वाचनालय, कुसुमाग्रज वाचनालय, पंचवटी सार्वजनिक वाचनालय, सुभाष वाचनालय ही वाचनालये अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात. आणि वाचन चळवळीला प्रोत्साहन देत असतात. उद्याचा संपन्न विचारांचा नागरीक घडवण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये कर्तुत्ववान, महान व्यक्तींच्या कार्याची माहिती ग्रंथालयांच्या माध्यमातून पोहचवणे काळाची गरज आहे. सक्षम, रचनात्मक विचार ग्रंथालयेच देऊ शकतात हे मात्र निश्‍चित. 

विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष

विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888

वॉट्सअ : 8390035035

-मेल : vishwasjthakur@gmail.com

वेबसाईट : vishwasthakur.com

फेसबुक : vishwasthakurofficial

ट्विटर : @vishwasjthakur

Thursday, 27 September 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

पर्यावरण संतुलनासाठी एक पाऊल पुढे पडावे म्हणून..

गणेशोत्सव उत्साहात संपन्न झाला, भक्तांसाठी ती आनंद पर्वणी होती. श्रीगणरायाचे भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले. याहीवर्षी बर्‍याच गणेश मंडळांनी ध्वनीप्रदुषण रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि आदर्श उपक्रमाचा विचार दिला असे म्हणावयास हरकत नाही. याचबरोबर नाशिकमधील काही सामाजिक संस्थांनी गोदावरीचे प्रदुषण रोखण्यासाठी विशेष मोहीम घेतली होती. त्यामाध्यमातून जनजागृती केली. निर्माल्य नदीपात्रात टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टीक पिशव्या व रसायनांतील रंगामुळे जलप्रदुषण होते. त्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळते. तसेच नदीपात्रातील जलवनस्पती, मासे यांच्यावर देखील मोठा परिणाम होऊन पर्यावरण साखळी बिघडते यावर उपाय म्हणून ‘नेचर क्लब ऑफ नाशिक’ या संस्थेतर्फे अभिनव उपक्रम राबविण्याची चळवळ सुरू केली. निर्माल्य नदीपात्रात न टाकता त्यापासून खत बनविता येते याची माहिती दिली आणि दीड टन निर्माल्य नाशिक महानगर पालिकेला दिले. त्याचबरोबर निर्माल्यापासून खत कसे तयार करता येते याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यामुळे परसबागेतही खत निर्मिती करण्याचे मार्गदर्शनच मिळाले. प्रदुषण विरहीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भक्तांनी उचललेले हे प्रगतीशील पाऊल म्हणावे लागेल. पर्यावरण संवर्धनाचाच हा संदेश होता. काळानुरूप निसर्गाचा समतोल व प्रदुषण रोखण्यासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे.

विश्वास जयदेव ठाकूर
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Friday, 7 September 2018


मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा म्हणून...


गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसात होत आहे. वातावरण उत्साही होणार आहे. भावभक्तीचे वातावरण फुलणार आहे. या सार्या आनंदात पर्यावरण संतुलन जलप्रदुषण अशा विषयांचा कार्यकर्त्यांना बर्याच वेळा विसरच पडतो. परंतु या गोष्टी सामाजिक भान जागृत ठेवण्यासाठी पर्यावरण समतोलासाठी महत्वाच्या आहेत.
त्यासाठी शाडू मातीपासून गणपती तयार करण्याच्या विविध कार्यशाळा अनेक संस्थांमार्फत, शाळांमध्ये आजकाल मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जात आहेत व त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
त्याही पुढेग्रीन गणेशासारख्या प्रयोगातून निसर्गाचे रक्षण करण्याचा प्रयत्न होत आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरीस गणेशमुर्तीमुळे प्रदुषणाची समस्या भेडसवायला लागली होती, त्यावर उपाय म्हणून हा सामाजिक बदल समोर येत आहे. नाशिकमधील पेठे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वर्तमानपत्राच्या रद्दीपासून आकर्षक गणपती तयार केले
आणि एक प्रबोधनात्मक संदेश दिला.
गणेशोत्सवात ध्वनीप्रदुषण रोखण्यासाठी व्यापक चळवळ उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी गणेश मंडळाच्या समन्वयातून हा मार्ग निघू शकेल. थोडक्यात आपली संस्कृती पर्यावरणपुरक आहे. म्हणूनच आपले उत्सवही पर्यावरणपुरक असावेत, हा विचार आचरणात आणावा. बुद्धीनिष्ठ विचार आणि वैज्ञानिक पद्धती यांची सांगड घालून गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करता येईल.
विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष

विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888

वॉट्सअ : 8390035035

-मेल : vishwasjthakur@gmail.com

वेबसाईट : vishwasthakur.com

फेसबुक : vishwasthakurofficial

ट्विटर : @vishwasjthakur

Monday, 13 August 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK


जागतिक डावखुरे व नाशिक येथील चळवळ


जागतिक ‘लेफ्ट हॅण्डर्स’ दिनानिमित्त लेफ्ट हॅण्डर्स क्लब नाशिकच्या वतीने व्ही.एन.नाईक कॉलेज इथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात डावखुर्‍यांविषयी उपस्थितांनी विचार व्यक्त केले. आई आणि वडील दोघेही डावखुरे असल्यास मुलांचे डावखुरेपणाचे प्रमाण 26% असू शकते असे विज्ञान सांगते हे खरेदेखील ठरले आहे. डावखुर्‍या व्यक्तींची बौद्धिक पातळी तुलनेत उजव्या व्यक्तींपेक्षा जास्त असते. त्यांची कल्पनाशक्ती, संवेदनशीलता कलात्मकता ही बलस्थाने आहेत. त्यामुळे डावखुर्‍या मुलांकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात माझी प्रकट मुलाखत घेण्यात आली. कुठलीही व्यक्ती ही त्यांच्या कर्तुत्वाने मोठी होते. डावखुर्‍याबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत ते बर्‍यापैकी मोडीत निघाले आहेत. त्यामुळेच डावखुरेपणा ही अभिमानाची गोष्ट आहे. काळ आणि तंत्रज्ञान बदलल्यामुळे आज डावा, उजवा असा भेदभाव कमी झाला आहे. साध्या घटनेतून जीवनात यशस्वी होण्याची प्रेरणा मिळते. असा मी माझा प्रवास कथन केला.
डावखुर्‍यांविषयी अशा प्रकारची विचारांची आदान प्रदान करणारी चळवळ नाशकात सुरू झाली आहे. त्यातून एकत्र येऊन विचारमंथन सुरू झाले आहे. ते निश्‍चितच दिशादर्शक ठरावे. 

विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Wednesday, 25 July 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK


नाशिकची वाहतूक आणि स्वयंशिस्त

नाशिकमधील रस्ते वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. वाहनचालकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन, बेशिस्तपणा हे यामागचे कारण आहे. रस्ते वाहतूकीमध्ये होणारे अपघात हा ही एक प्रश्‍न यानिमित्ताने समोर आला आहे. हे अपघात कमी होण्यासाठी वाहनचालकाने काळजी घेण्याबरोबरच वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे निश्‍चितच अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार नाशिक शहरात 1 जानेवारी ते 30 जून 2018 या कालावधीत झालेल्या 99 जीवघेण्या अपघातांमध्ये 100 जणांचा बळी गेला आहे. 2017 च्या याच कालावधीच्या तुलनेने ही वाढ काहीशी झालेली आहे.
वाहतूकीतील अपघात रोखण्यासाठी नुस्तीच कारवाई हा उपाय नसून त्यासाठी नागरीकांचे सहकार्य अपेक्षित आहे. शहरात सर्वाधिक अपघात हे दुचाकी स्वारांचे होत असतात. तसेच रस्ता ओलांडणार्‍या पादचार्‍यांना धडक देण्याचे प्रमाणही जास्त आहे. हेल्मेट सक्ती सीटबेल्टचा वापर आणि वाहनांची गती कमी करणे हे मूलभूत उपाय यावर आहेत त्याची अमलबजावणी प्रत्येक नागरीकाने केल्यास सकारात्मक चित्र दिसेल.
शालेय तसेच महाविद्यालयीन पातळीपासून शहर वाहतूक शाखेत अनेक प्रबोधनात्मक उपक्रम राबवले आहेत व राबवत आहे. त्याचेही चांगले परिणाम दिसून येत आहेत. नाशिकचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता नागरीकांनी स्वयंशिस्त बाळगण्याबरोबरच प्रशासन यंत्रणेला सहकार्य करणे तितकेच गरजेचे आहे.


विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Friday, 6 July 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK


वंचितांचे शिक्षण आणि नाशिक

नाशिक शहराची शैक्षणिक क्षेत्रातील वाटचाल गुणवत्तापूर्ण व आधुनिक आहे. आज देशातील अनेक महत्त्वाच्या शिक्षण संस्था नाशिकमध्ये आल्या आहेत. त्यातून शिक्षणाच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. नाशिकमधील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्या-मुंबईला जात असत. पण नाशिकने अल्पावधीतच ‘एज्युकेशन हब’ म्हणून मान्यता मिळविलेली आहे. आज नाशिक व परिसरातील महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात नाव कमावत आहेत. त्याचबरोबर एका बाजूला झोपडपट्टी आणि कामगार वस्तीतील मुला-मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज आहे. या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या समस्या सोडवणे, शैक्षणिक साहित्य, सकस आहार, शाळांना संगणक, खेळाचे साहित्याचे वाटप, ह्या काही मुलभूत गरजाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. जेणेकरुन, त्यांच्या विकासाला चालना मिळेल व शिक्षण विकासाचे चित्र समोर येईल. सामाजिक संस्था, औद्योगिक वसाहतींनी यासाठी पुढाकार घ्यावा. जेणेकरुन, या मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल.

विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

ब्लॉग क्रमांक : 51

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK
नाशिक उद्योग-व्यवसायासाठी ‘स्किल सिटी’

नाशिकची वाटचाल ‘स्मार्ट सिटी’कडे होत असतांना इथल्या रोजगार व उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी, विकासासाठी निश्‍चित पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत. याचाच एक भाग म्हणून ‘स्मार्ट सिटी विकास प्राधिकरण आणि महानगरपालिका नाशिक’ यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या माध्यमातून सुमारे दहा हजार युवकांना कौशल्य विकासावर आधारीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आणि त्यातून ‘स्किल सिटी’ करण्याची संकल्पना आहे.
नाशिकमध्ये आज अनेक उद्योग व्यवसाय येत असून मोठ-मोठ्या प्रकल्पांचा यात समावेश आहे. उद्योग व्यवसायाच्या उद्योग-वाढीसाठी पायाभूत सुविधांबरोबरच तंत्र कुशल मनुष्यबळ असण्याची आवश्यकता आहे. नाशिकमध्ये अनेक शिक्षणसंस्था अभियांत्रिकी महाविद्यालये असून त्यातून अनेक तरूण पदवी घेऊन बाहेर पडत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी केल्यास नवे चित्र समोर येईल. युवकांच्या ज्ञानाला उद्योजक केंद्रीत मार्गदर्शन केल्यास त्यांच्यात नवे घडवण्याची मानसिकता निर्माण होईल. बांधकाम व्यावसायिक संस्था, इलेक्ट्रॉनिक कंपन्या अशा अनेक क्षेत्रात या तरूणांना संधी दिल्यास नाशिकच्या आधुनिक विकासाचे चित्र समोर येईल.


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur