Monday, 15 April 2019

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

पाणी बचतीसाठी जलसाक्षरता महत्त्वाची


दिवसेंदिवस पाण्याची समस्या तीव्र होत असून पाणी संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर नद्यांतील पाण्यात होणार्‍या प्रदुषणाचा धोका निर्माण होत आहे. नुकताच केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सर्व राज्यात जलस्रोतांची तपासणी करण्यात आली. त्यात सर्वेक्षणात हे मुद्दे उपस्थित केले आहेत.
जनसामान्यांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होणे ही जलनीतीची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन आणि योग्य वापर करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पर्यावरणाचा दिवसेंदिवस बिघडणारा असमतोल आणि पाण्याचा गैरवापर, बेशिस्त वापर हे जलसंवर्धन करण्यातले महत्त्वाचे अडथळे आहेत. पाण्याचे नियोजन करतांना फायदेशीर बाबींचा योजनांचा विचार करणे महत्त्वाचे असते. रोजच्या व्यवहारात स्वयंपाक, आंघोळ, धुणीभांडी आदिंसाठी पाण्याची गरज आहे. पण वापरण्याच्या पद्धती कशा आहेत यांवर विचारमंथन व्हावे.
त्याचबरोबर नैसर्गिक जलस्रोत जपावेत. यासाठी उद्योगांसाठी लागणारे पाणी, घराघरातून निघणारे सांडपाणी यांसदर्भात जनजागृतीही तितकीच महत्त्वाची आहे. पाणी हे जीवन आहे व पाणी वाचवणे ही भविष्याची बचत आहे हे सत्य आहे. त्यासाठी एकात्मिक नियोजन, जलसंधारणाच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब व लोकसहभाग वाढवणे म्हणजेच जलसाक्षरता निर्माण होईल.

(विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Tuesday, 9 April 2019

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

मनावर आनंदाचे फुल फुलण्यासाठी...


राज्यातील मानसोपचार तज्ज्ञांनी नुकतान एक अनोखा जनजागृतीचा उपक्रम जनतेसाठी राबविला आणि त्याला जनतेनेही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खरंतर या अभियानाचा विषय होता ‘मानसिक स्वास्थ्य’. मानसोपचार तज्ज्ञांनी खेडोपाड्यात जाऊन गावकर्‍यांशी चर्चा करुन या आजाराविषयी माहिती दिली. शास्त्रीय पद्धतीने निरसन केले. नैराश्य किंवा उदासीनता ही भावना पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ असेल तर ती व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त आहे, असे समजावे असे लक्षण सांगितले. याप्रकारचे पेशंट खेडोपाड्यात दिवसेंदिवस वाढत आहेत असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्यासाठी हे अभियान सुरु असल्याचे गावकर्‍यांना सांगितले आणि अनेक शेतकर्‍यांनी आपली व्यथाच डॉक्टरांसमोर मांडली. त्यात सोशल मिडीया, कुटुंब पद्धतीतील वाद, शेतीव्यवसायाला आलेली अवकळा हे विषय त्यांनी मोकळेपणाने कथन केले.
‘गाव तेथे मानसोपचार’ ही संकल्पना घेऊन मानसिक आरोग्याविषयी जागृती करण्यासाठी ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. जीवनशैलीतील बदल, वाढती जीवघेणी स्पर्धा, विसंवाद यामुळे हे प्रश्‍न निर्माण होत आहेत. त्यावर समुपदेशन होण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. तरुण पिढीवर सोशल मिडीयाचे आक्रमण वाढत आहे आणि त्यातून त्यांचा जीवन व्यवहार ढासळत आहे. हा जसा महानगरातील प्रश्‍न आहे तोच प्रश्‍न खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला आहे. त्यापासून आपण वेळीच सावध व्हायला हवे.

(विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Friday, 5 April 2019

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

लोकशाही सशक्त, सुदृढ करण्यासाठी 



मतदान करणे हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाने बजावले पाहिजे यासाठी शासकीय पातळीवरून ते सामाजिक संस्थापर्यंत प्रयत्न होत आहेत. मतदानाचा हक्क लोकशाहीने बहाल केला आहे आणि त्याची जपवणूक केलीच पाहिजे. या जाणिवेतून नाशिक ‘सायकलिस्ट फाऊंडेशन’तर्फे मतदान जनजागृती करण्याचे अभिनव पाऊल उचलले आहे. गेटवे ऑफ इंडीया ते इंडिया गेट अर्थात मुंबई ते दिल्ली असा सायकलने प्रवास करत संदेश दिला जाणार आहे. हे अंतर अवघ्या 72 तासात हे सायकललिस्ट पार करणार असून इंडीया गेटवर गुढी उभारणार आहेत.
सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्‍नांना जाणून घेऊन ते सोडवणे ही सरकारची जबाबदारी असते. परंतू त्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. त्यासाठी ही चळवळ उभारली आहे. लोकशाही मजबूत व भक्कम करण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा भाग आहे असे आपण म्हणूया.
देशात तरूणांची संख्या जास्त आहे. त्यांनी मतदानाचा हक्क जबाबदारीने पेलल्यास लोकशाही सदृढ होण्यासाठीही आणि नव्या विचारांची पिढी देशाला प्रगती पथावर नेऊ शकेल. सकारात्मक वैचारीक आणि सर्वांच्या विकासासाठी झटणारा पारदर्शक, कार्यक्षम उमेदवार, लोकप्रतिनिधी निवडूण देण्यासाठी मतदानाची प्रक्रीया पार पाडणे महत्त्वाचे आहे. 

(विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Thursday, 4 April 2019

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...
TOGETHER FOR NASHIK

गोदावरीला पुनर्वैभव प्राप्त व्हावे म्हणून



गोदावरी संवर्धनासाठी, स्वच्छतेसाठी अनेक संघटना सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत. गोदावरी पुनर्जीवन व प्रदुषण मुक्तीसाठी हा लढा सुरू आहे आणि त्याला बर्‍यापैकी यश येत आहे.’ नमामी गोदा फाऊंडेशनतर्फे उच्च न्यायालयात 2012 मध्ये गोदावरी पुनर्जीवन जनदिन याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेनुसार उच्च न्यायालयाने गोदावरी व तिच्या उप नद्यांच्या प्रदुषण मुक्तीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वेगाने गोदावरी संदर्भात प्रश्‍नांचा निपटारा होत आहे. या समितीकडे ऑनलाईन तक्रार केली तरी त्यावर तोडगा काढला जातो असे नागरिकांना अनुभवास येत आहे. याचबरोबर नाशिकमधील पर्यावरण जागृतीसाठी काम करणार्‍या तरुणींनी एकत्र येऊन गोदावरी प्रदुषणाबाबत अहवाल तयार केला आहे. मृण्मयी चौधरी-पेंडसे व शिल्पा डहाके या वास्तूविशारद तरुणींनी गोदावरीला पुनर्वैभव प्राप्त करून सौंदर्यबहाल करण्यासाठी नासर्डी नदीचा अभ्यास केला व त्याच्या आजूबाजूच्या जनजीवनाचा संवादातून वेध घेतला, त्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. नदीला आलेल्या पुराचा इतिहास, नदी किनारी, हिरवे आच्छादन किती आहे? ‘अर्बन डायलॉग’ हे उपक्रमाचे नाव आहे. या उपक्रमातून गोदावरीची परिक्रमा करण्यात आली आणि त्यातून प्रदुषणाविषयी जनप्रबोधन झाले. गोदेचे महत्त्व जनमाणसात जबाबदारीने नोंदले गेले. अशा अनेक तरुण-तरुणींनी गोदेच्या वैभवाचं ध्येय हाती घेऊन नवा कृतीशील विचार देण्याचे काम हाती घेतले आहे, या चळवळीत आपणही सहभागी होऊ या.

(विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Tuesday, 2 April 2019

‘महिलांचे आयुष्य निरोगी रहावे म्हणून’

‘महिलांचे आयुष्य निरोगी रहावे म्हणून’

महिलां कुटुंबाच्या सर्वच आघाड्यांवर मेहनतीने, कष्टाने लढत असतात. आणि जबाबदारी पेलत असतात. हे करत असतांना त्यांचे बर्‍याचदा आरोग्याकडे दुर्लक्ष होते.
महिलांनी आरोग्य संवर्धनाकडे लक्ष द्यावे म्हणून ‘टीम इथ्री’च्यावतीने
‘वूमन ऑन व्हील्स राईडचे’ आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि आरोग्याविषयी जनजागृतीचा संदेश दिला. महिलांचे आरोग्य जर उत्तम असेल तर ती कुटुंबाकडे योग्य लक्ष देऊ शकते. पण ती जेव्हा आरोग्य समस्यांनी बेजार असेल तर त्याचा कुटुंबावर विपरीत परिणाम होतो. महिला सोशिक असल्याने दु:ख अंगावर काढण्याची त्यांंची सवय असते. त्यामुळे दुखणे विकोपाला जाऊ शकते. बदलत्या जीवन शैलीमुळे त्यांच्यात आजारांचे प्रकारही वाढत आहेत. त्यावर उपाय म्हणजे योग्य आहार, व्यायाम, योगासने करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात अजूनही महिलांना योग्य आहार नसल्याने मुले कमी वजनाची, जन्माला येतात यासाठीच योग्य आहाराची समस्या आहेच. त्यावरही उपाय शोधणे गरजेचे आहे.
समाजातही महिलांच्या आरोग्याविषयी संवेदनशीलता निर्माण होत आहे. आणि त्यातून नवी जीवन जाणीव निर्माण होत आहे हे मौलिक आहे.
महिलांच्या शिक्षणाच्या कौटुंबिक, सामाजिक हिंसाचार अशा मुलभूत समस्यांवरही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यातून महिला सबलीकरणाचा, सक्षमतेचा विचार रूजण्यास मदत होईल.

(विश्वास जयदेव ठाकूर)

संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक

मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur