Friday, 29 June 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

नाशिकचे पर्यावरण

पर्यावरण संतुलन उत्तम रहावे. हवा शुद्ध रहावी यासाठी वृक्षारोपण करण्यात येते. यात विविध संस्था सहभागी होतात आणि सामाजिक जाणीवेतून योगदान देत असतात. नाशिक वेगाने पर्यंटनस्थळ म्हणून विकसित होत असतांना पर्यटकांना इथला परीसर डोंगर, वनराई साद घालत असते. त्याचबरोबर इथल्या धार्मिक स्थळांचेही वेगळेपण आहेच. स्मार्ट नाशिक म्हणून नाशिकची वाटचाल होत असतांना ‘हरीत नाशिक, स्वच्छ नाशिक’ ही घोषणा खर्‍या अर्थाने प्रत्यक्षात आणण्याची गरज आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनचळवळ उभारण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. नाशिक व परिसरातील मोकळ्या जागेवर वृक्ष लागवड करावी त्यासाठी शासनाकडून मोफत रोपे उपलब्ध होतात. त्याचे नियोजनपूर्वक वाटप करावे. शालेय तसेच महाविद्यालयीन पातळीवर पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा घेऊन विद्यार्थी तरूणांमध्ये यावर प्रबोधन करावे. पर्यावरण असमतोल झाल्यामुळे पृथ्वीला मोठे धोके निर्माण होऊ शकतात. यासाठी वृक्षारोपण काळाची गरज ठरत आहे.
नाशिकच्या औद्योगिक परिसरातही प्रदुषण होत आहे. अनेक रासायनिक कंपन्या असल्यामुळे प्रदुषणाचा विळखा वाढतो आहे. यासाठी तेथे जाऊन वृक्ष लागवड समुपदेश करणे नाशिकच्या शुद्धतेला पूरकच ठरेल. 


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Saturday, 23 June 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

नाशिक व बालकामगारांचे शिक्षण

बालकांना त्यांचे भावविश्व जपण्यासाठी, आनंदासाठी शाळा ही उपयुक्त भूमिका बजावत असते. त्यांच्या पंखांना आकाश लाभत असते. परंतू परिस्थितीच्या पुढे कोणाला जात येत नाही, असे म्हणतात. आर्थिक ओढाताणीमुळेही अनेक मुलांना शाळेत जाता येत नाही. त्यावर पर्याय म्हणून मुलांचे बालकामगार  म्हणून आयुष्य सुरु होते. अशा मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘चाईल्डलाईन’ या संस्थेने नुकताच अनोखा उपक्रम राबवला व नवा आदर्श घालून दिला आहे निमित्त होते जागतिक बाल कामगार दिनाचे. ‘हाती नको काम हवे पुस्तकी ज्ञान’ 
‘काम नको-शिक्षण द्या’ अशी हाक या मुलांच्या उज्ज्वल भविष्याला दिशा देणारी होती.
बालवयात काम न करता, शिक्षण दिले पाहिजे. या विषयी या संस्थेतर्फे जनजागृती करण्यात आली. 
कामगार वस्तीतील, झोपडपट्टीतील अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. अशा मुलांना यामुळे शिक्षणाची कवाडे खुली होणार आहेत. आणि त्यांना मुलभूत हक्क मिळणार आहे व त्यातून त्यांचा उत्कर्ष होणार आहे. समाज प्रगतीपथावर नेण्यासाठी चाईल्ड लाईन सारख्या संस्थांचे कार्य म्हणूनच दिशादर्शक आहे. आणि नाशिकच्या सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना यातून प्रेरणा मिळणार आहे.

(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Thursday, 21 June 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

योगसाधना व संगीत

मनाचे शरीराचे संतुलन योग्य राहण्यासाठी ‘योग साधना’ उपयुक्त आहे. हे सिद्ध झाले आहे योग हा केवळ व्यायाम नसून तंदूरस्त आरोग्याचा मंत्र आहे. आजच्या धावपळीच्या युगात ताण-तणावात वाढ झाली आहे. त्यावर प्रभावी वापर म्हणजे योग करणे आहे. योगामुळे  आपल्यातील सजगता वाढते आणि स्थिर मनासाठी आनंदी मनासाठी उपयुक्त अशी जीवनशैली ही आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेली भारतीय योगसाधना योग गुरूंनी ही देणगी जगाला, नव्या पिढीला अर्पण केली आहे. योग मुख्यत्वे करून ज्ञानयोग, भक्तीयोग, अष्टांग योग यातील एक भाग आहे.
जगभरात आयुर्वेदाबरोबरच संगीत, नृत्यासोबतच योग आवश्यक मानला जातो. धकाधकीच्या जीवनात जीवन जगण्याचा मार्ग योगाने शिकवला आहे. जागतिक योग दिनानिमित्त मनस्वास्थ्यासाठी सामूहिक योग साधना लोक करत आहे. मानवी समूहात स्वतः बरोबरच समाज स्वास्थासाठी योग महत्वाची भूमिका बजावतात. शारीरीक लाभाबरोबरच मानसिक शांती व अध्यात्मिक उन्नती हेही यातुन मिळणार आहे. नाशिक शहरात परिसरात शाळा, महाविद्यालयांमध्ये योग कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहेत. त्यातून नवा विचार मिळेल. आजच्या पिढीला याचे महत्व कळेल व त्यातून आरोग्यविषयक जनजागृती होण्यास मदत होईल.

संगीत व योगसाधना ह्या जीवनाच्या दोन मुलभूत बाजू आहेत. मन:शांती बरोबरच, स्वरांनी मनावर व्हायब्रेशन्स निर्माण होतात. भारतीय संगीताच्या विविधतेमुळे त्यातील नाविन्य कायमच आपल्याला खुणावते. म्हणूनच अनेक अध्यात्मिक सोहळ्यात, किर्तन परंपरेतही. संगीताचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करण्यात येतो आणि मानवी मनातील अमूर्तभाव जागृत होतो. कबीर, सुरदास यांची भजने ही मानवी जगण्याची अवस्था, नवा विचार प्रकट करतात. योगाच्या साथीने संगीताचा संस्कार उल्हासित बनवत असते आणि जीवन सुखकर बनवते. जागतिक योगदिन व संगीतदिवस हा योगायोगच आहे.

(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Wednesday, 13 June 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

गोदावरीचे संवर्धन

गोदावरीचे पावित्र्य आणि शुद्धता राखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना केली जात आहे. अनेक सामाजिक संस्थांनी यात पुढाकार घेतला असून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनप्रबोधन केले जात आहे. गोदावरीला पुर्नवैभव मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. नुकतीच गोदावरीच्या संवर्धनाबाबतीत काम करण्यासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, ओरीसा, कर्नाटक, पाँडेचेरी या सात राज्यातील  ज्येष्ठ सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी, अभ्यासक चळवळीतील कार्यकर्ते एकत्र आले आहेत. आणि संवर्धनाचा निर्धार केला आहे.
पर्यावरणाचा समतोल ही आज महत्वाची समस्या ठरली आहे. त्यावर निश्‍चित उपाय शोधणे सर्वांची जबाबदारी आहे. नुसतेच आंदोलने करणे हा यावर उपाय नसून, विविध क्षेत्रातील तज्ञांनी एकत्र येऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग करणे, यासाठी उपयुक्त ठरेल. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी यासाठी शालेय पातळीवर अभ्यासक्रम तयार करणे तसेच पथनाट्यांच्या माध्यमातून लोकप्रबोधन करणे प्रभावी मार्ग ठरेल. लोकप्रतिनिधींनी यासाठी जाणीवपूर्वक पुढाकार घेऊन गोदावरी स्वच्छतेचा विचार सर्वापर्यंत नेणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पातळीवर यासाठी एकसंघ जाणीवेतून ही चळवळ निश्‍चित योग्य दिशा देईल. 


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Tuesday, 12 June 2018


मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

नाशिक व प्लास्टिक मुक्ती

प्लास्टिक मुक्ती हा आज महत्त्वाचा मुद्दा आहे. पर्यावरण संतुलन आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध संस्थांनी, पुढाकार घेतला आहे आणि जनजागृती करत आहेत. याचाच एक भाग म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘टाकाऊतून टिकाऊ’ या उपक्रमातून दैनंदिन वापरासाठी लागणार्‍या कागदी पिशव्या पाकिटे बनवून ते विक्रीसाठी आणण्याचा संकल्प पर्यावरण दिनाच्या पार्श्‍वभूमीवर केला आहे. बचतगट चालविणार्‍या महिलांना कागदापासून पिशव्या, पाकीटे बनविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित केले आहे आणि त्यातून अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. पर्यावरण संतुलनासाठी समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत विचार पोहोचवणे गरजेचे आहे. पण त्यासाठी कृतीशीलता महत्त्वाची आहे. तोच विचार मुक्त विद्यापीठाने जोपासला आहे.
‘स्वच्छ नाशिक-सुंदर नाशिक’ ही संकल्पना खर्‍या अर्थाने रूजवण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम निश्‍चितच मार्गदर्शक आहेत. नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत कागदापासून तयार केलेल्या वस्तूंचे मार्केटींग केल्यास महिलांना आर्थिक लाभ मिळू शकतात आणि त्यांचे जीवनमानही सुधारण्यास मदत होईल. बाजार समितीत फळे विक्रीसाठी भाजीपाला विक्रीतही कागदी पिशव्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.  अशा अनेक उपयोगांसाठी हा उद्योग भरभराटीस येऊ शकतो व विचारही पोहोचू शकतो. 


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Wednesday, 6 June 2018

TOGETHER FOR NASHIK

नाशिकचे पर्यावरण रक्षण

हरीत नाशिक ही संकल्पना रूजवण्यासाठी सर्व नाशिककर एकत्र आले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या चळवळीचा हा एक भाग आहे. नाशिक व परिसरात झाडांच्या व डोंगरांच्या रांगा आहेत. त्यामुळेच दिवसेंदिवस पर्यटकांना नाशिकचे आकर्षण वाटते. जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधून ‘नमामि गोदा फाऊंडेशन’ व ‘‘नाशिकची आई गोदामाई’ या संस्थांच्या वतीने नंदिनी नदी किनार्‍याजवळ वृक्षारोपण करून परिसर निसर्गरम्य करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्याचबरोबर परिसर स्वच्छ ठेवण्याचाही संकल्प केला.

नाशिक शहरातून वाहणार्‍या नंदिनीला आजकाल नद्यांचे स्वरूप आले आहे. त्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली आहे. या सामाजिक संस्थांनी केलेल्या प्रयत्नांतून नंदिनीला पुर्नवैभव प्राप्त होण्यास निश्‍चित मदत होईल. 

पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणाबरोबरच श्रमदानातून इथले रूप पालटणार आहे. झाडे लावण्याबरोबरच ती जगवली पाहिजेत व त्यातूनच आपले आरोग्य चांगले राहिल निरोगी राहील. हा विचार यामागे आहे. नाशिक महानगरात वेगळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम निश्‍चितच दिशादर्शक आहेत. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

नाशिक औद्योगिक विकासात अग्रेसर

नाशिकचा सर्चच क्षेत्रातील विकास वेगाने आणि आधुनिकतेने होतो आहे. याचाच एक भाग म्हणजे नाशिकमधील औद्योगिकीकरण. नाशकात सध्या ‘इंडोएक्स्पो’ नावाचे औद्योगिक प्रदर्शन सुरू आहे. या उद्योगास लागणारे विविध तंत्रज्ञान व मशीनरी उद्योजकांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. अत्यंत वैशिष्ठपूर्ण प्रकारची उत्पादने यात आहेत. त्याचबरोबर नामांकित कंपन्यांचे उपकरणांचे प्रात्यक्षिक बघता येणार आहे. इंडस्ट्रीअल ऑटामेशन्स, मशिन टुल्स, बिअरींग स्विचगिअर, गिअर्स व पंप, वेल्डींग उपकरण, फार्मा मशीनरीज, मटेरिअल्स, हेंडलिंग अशा अनेक उपकरणांची माहिती व प्रात्यक्षिक उत्पादकांना मिळणार आहे.

देशातील एक्साइज इंडिया, बॉश फेरोबिझनेस टेक्नॉलॉजी अशा व अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत. औद्योगिकीकरणामुळे देशाच्या प्रगतीला दिशा मिळाली आहे. त्यातूनच नाशिकचे उद्योगक्षेत्र जगाच्या नकाशावर आपले वेगळेपण टिकवून आहे. अनेक रोजगार यामुळे उपलब्ध झाले आहेत. आणि नाशिकची आर्थिक उलाढालही वेगाने वाढली आहे. अनेक प्रमुख उत्पादनांची निर्यात जगभर नाशिकमधून होत आहे. अनेक नवे तरूण पिढीतील उद्योजक प्रयोगशील जाणिवेतून उद्योग उभारत आहेत व विकासात आपले योगदान देत आहेत. नाशिकमधील परिसरातील इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थीही संशोधनाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्राला गती देत आहेत. म्हणूनच औद्योगिक विकासात नाशिक अग्रेसर होत राहिल.


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur