Tuesday, 24 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
‘नाशिकच्या सौंदर्यासाठी’
नाशिकमध्ये वसुंधरा दिनाचे औचित्य साधून अभिनव अशा वृक्ष रेखाटनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. रत्ना भार्गवे ह्या चित्रकार आहेत. निसर्ग हा माणसाचा मित्र आहे. निसर्गाकडे
पाहणे त्याला समजून घेणे हा खरा अनुभव असतो.
पर्यावरणाचा समतोल आणि संतुलन राखण्यासाठी झाडे हा महत्त्वाचा घटक आहे. निसर्गाकडे चला हा संदेश मानवी जगण्याच्या आत्मशांतीचा नवा मार्ग आहे. यासाठी झाडे लावणे हा महत्त्वाचा मार्ग आहे. नाशिक जिल्हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. उंच-उंच डोंगर रांगा आणि पर्यटकांसाठी नवी पर्यटनस्थळे हे नाशिकच्या विकासाला दिशा देणारे महत्त्वाचे घटक आहेत.
‘हरीत नाशिक-सुंदर नाशिक’ ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी निसर्गाचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येक नागरीकाची जबाबदारी आहे. शाळा, महाविद्यालये येथे जाऊन वृक्षारोपण करणे व त्यांचे भविष्यातील फायदे, वैज्ञानिक उपयोग समजावून सांगणे गरजेचे आहे. नाशिकच्या सौंदर्यात त्यामुळे भर  पडणार आहे. यातून निश्‍चितच हरीत नाशिकच्या कार्याला बळ मिळण्यास मदत होईल. जागतिक उष्ण तापमानात होणारी जलद वाढ हवामान आणि ऋतुबदलांच्या जैवसृष्टीची स्थिरता ठेवण्यासाठी वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज आहे. वृक्ष लागवडीतून औषधोपयोगी झाडांची लागवड व्यावसायिक उत्पन्नासाठी पूरक ठरणार आहे. प्रयोगशील जाणिवेतून पडिक जमिनीवर वृक्ष लागवड केल्यास नाशिकचे सौंदर्य वाढेल व सुंदर नाशिकचे स्वप्न साकार होईल.


विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Saturday, 21 April 2018

TOGETHER FOR NASHIK

‘नाशिकच्या उद्योगक्षेत्राची नवी झेप’


वेगाने विकसित होणार्‍या नाशिकच्या उद्योगक्षेत्राने मोठी आघाडी घेतली आहे. देशातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प नाशिकमध्ये स्थिरावले आहेत व अनेक रोजगारही उपलब्ध झाले आहेत. अनेक रोजगारही उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे नाशिकची औद्योगिक झेप प्रगतीशीलतेकडे होत आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणजे देशामध्ये पहिल्यांदाच कोल्ड रोलिंगपासून कोल्ड ग्रेन ओरीएंटेड इलेक्ट्रीकल स्टीलचे उत्पादन नाशिकमधून करण्यात येणार आहे. देशात वर्षाकाठी सुमारे चार लाख टन सीआरजीओ स्टीलची मागणी आहे. पण या ग्रेडचे स्टील भारतामध्ये अद्याप उत्पादित होत नव्हते. आता थिसेनकृ्रपच्या नाशिकमधील प्रकल्पात अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने स्टील निर्मितीला सुरूवात झाली आहे. ही कंपनी आता वर्षाकाठी 35 हजार टन सीआरजीओ स्टील निर्माण करणार आहे. हे उत्पादन भारतातील एकमेव आहे.
मेट्रो सिटीकडे होणारी नाशिकची वाटचाल औद्योगिक क्रांतीकडे, नव्या युगाकडे नेणारी आहे.     असे नव-नवे प्रकल्प नाशिकच्या नावलौकीक वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहेत. थिसेनक्रुप या कंपनीने ह्या उत्पादनाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असतांना नशिक शेती आणि सेवा क्षेत्राबरोबरच उद्योगाला अनुकूल आहे याचे हे सुचिन्ह म्हणावे लागेल. स्टील उत्पादनाच्या बाबतीत भारताचे स्थान पाचव्या ते सहाव्या क्रमांकावर आहे. पण आता यामुळे भारताची नोंद जागतिक स्तरावर झाली आहे हे उद्योगक्षेत्राला बळ आणि आत्मविश्वास देणारे आहे.


विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Thursday, 19 April 2018

TOGETHER FOR NASHIK
‘नाशिकची कलापरंपरा’

मूक चित्रपटाचे नायक भाऊराव दातार यांनी मराठी चित्रपट सृष्टीला मोठे योगदान दिले आहे. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेल्या त्यांच्या 60 चित्रपटांमध्ये भाऊराव विविध भूमिकेत होते. अष्टपैलू अभिनय व राजबिंडे रूप यामुळे चित्रपटसृष्टीत भाऊरावांचा दबदबा होता. नानासाहेब सरपोतदार, मास्टर विनायक आणि भालजी पेंढारकर यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत त्यांनी मूक व बोलपटांमध्ये काम केले. प्रतिभावंत अभिनेते म्हणून त्यांनी ख्याती निर्माण केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नाशिक तर्फे भाऊरावांच्या जीवन व कला प्रवासाचा वेध घेणारा ‘भाऊराव दातार-अ कर्टन कॉल’ नावाचा लघुपट दाखवण्यात आला. त्यांचे नातू सुप्रसिद्ध चित्रपट अभ्यासक भरत कान्हेरे यांनी ह्या लघुपटाचे संशोधन व दिग्दर्शन केले होते.
भाऊरावांचे वडील नाशकात व्यवसायानिमित्ताने आले आणि त्यांना व्यवसायात मदत करतांनाच मास्टर दिनानाथ व बालगंधर्व अशा दिग्गज कलावंताचा त्यांनी अभिनय बघितला. आणि अभिनय करण्याचे ठरवले. त्यातून त्यांची वाटचाल बहरत गेली. भाऊरावांनी आजपर्यंत 119 चित्रपटांमध्ये योगदान दिले.
नाशिकच्या कलापरंपरेचा संपन्न वारसा आहे. चित्रपट व्यवसायाची मूहुर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके यांच्या तालमीत अनेक कलावंत तयार झाले. त्यातीलच एक भाऊराव होते. त्यांनी पडद्यावर साकारलेल्या शिवाजी महाराजांच्या भूमिका अजूनही रसिकांच्या स्मरणात आहेत.

आज नाशिकचे अनेक कलावंत आपल्या नाशिकचे नाव उज्ज्वल करत आहेत. त्यांना अशा महान कलावंतांच्या कार्याची शिदोरी परंपरेने आली आहे. त्याची सर्वांनी जोपासना करावी व कलाक्षेत्राला योगदान द्यावे. 


विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Wednesday, 18 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
‘नाशिकचा विकास व तरूण संशोधक’

नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या तृतीय वर्षे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर बॅटरी चार्ज करून धावणारी इलेक्ट्रीक मोटर तयार केली. हे विद्यार्थी नाशिकमधील आहेत. तरूणांमधील संशोधन वृत्ती आणि त्यांना असलेले सामाजिक भान यातून व्यक्त होते. आज नाशिकचा चहूबाजूंनी वेगाने विस्तार होत आहे. पर्यावरण, वाहतूकीच्या समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर तरूणांनी केलेल्या संशोधनाला विशेष महत्त्व आहे.
प्रदुषणमुक्त नाशिकसाठी सौर उर्जेवर चालणारी वाहने उपयुक्त आहेत.त्यातून पर्यावरणाविषयी प्रबोधन होण्यास मदत होईल.
आज नाशिक शहरात आर्कीटेक्चर, कृषी, फार्मसी, इंजिनिअरींग अशी नामांकीत कॉलेजेस सुरू झाली आहेत. त्यातून अनेक विद्यार्थी प्रयोगशील अभ्यासूवृत्तीने ज्ञानसाधना करत आहेत. त्यातील वास्तूशास्त्राचे विद्यार्थी नाशिक शहराची रचना सुंदर असावी यासाठी प्रयोग करत आहेत व प्रतिकृती प्रदर्शनातून मांडत असतात. कृषी महाविद्यालयांचे विद्यार्थी नवनवीन पिकांचे उत्पन्न  शेतकर्‍याला कसा आर्थिक लाभ मिळवून देतील याबाबत माहिती देत असतात.

नाशिकचा सर्वच क्षेत्रात विकास होण्याच्या दृष्टीने अनेकांचा हातभार लागत आहे त्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Monday, 16 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
‘महामानवाचे विचार व हरीत नाशिक’

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा, बंधुत्वाचा संदेश दिला. लोकशाही, मूलभूत हक्क यांविषयी विचार मांडले, नवी दृष्टी दिली. याच बरोबर डॉ. आंबेडकरांना कृषी व्यवस्थेची उत्तम जाण होती. सामूहिक शेतीचे ते पुरस्कर्ते होते. ग्रामीण भागात विखुरलेला समाज एकसंध करायचा तर शेती व्यवसायाचं चित्र बदललं पाहिजे. याबाबत ते आग्रही होते. शेती हा ग्रामीण भागातील आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू आहे. अनेकांना ते रोजगाराचे माध्यम आहे. त्यामुळे शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन हा उद्योग म्हणून असला पाहिजे. ही त्यांची ठाम धारणा होती. इतक्या दूरदृष्टीने व सखोलतेने त्यांनी शेतीकडे बघितले. सर्वसामान्यांच्या विकासाकडे ते कायमच आपुलकीने आस्थेने बघत. हे सांगण्याचे कारण की डॉ. बाबासाहेब जयंतीनिमित्त दिंडोरी रोडवरील गोरक्षनगर मित्र मंडळाने एक अभिनव उपक्रम केला. डी.जे.ला मिरवणूकीला दूर सारत नवा आदर्श दिला. तेथील कार्यकर्त्यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला व वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. 

डॉ. बाबासाहेबांच्या कृषी विषयक विचारांना कृतीशीलतेने जपण्याचाच हा उपक्रम आहे. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आज नाशिकसारख्या महानगरात प्रदुषणाने विळखा घालायला सुरूवात केली आहे. वाढते औद्योगिकरण, वाहतूक यामुळे प्रदुषणात वाढ होत आहे. यासाठी महामानवाच्या विचारातून विकासाला नवी दिशा मिळू शकते हा वस्तुपाठ यातून समोर आला आहे. ‘सुंदर नाशिक-हरीत नाशिक’ या संकल्पनेला यातून बळ मिळेल. हा आदर्श सर्व नाशिककरांनी घ्यावा.


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Friday, 13 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
‘नाशिकमध्ये रुग्णांसाठी मायेचा आधार’

आजकाल अनेक कुटुंबांना दारिद्रयामुळे आरोग्य विषयक उपचारांचा खर्च परवडत नाही. यासाठी अनेक सेवाभावी संस्था हातभार लावत असतात व रुग्णसेवा करत असतात. याच जाणिवेतून नाशिकच्या ‘इंडीयन मेडीकल असोसिएशन, नाशिक’ने पुढचे पाऊल उचचले आहे. कर्करोगासह दुर्धर आजारातून रुग्णांची देखभाल करण्यासाठी ‘हॉसपीस’ ही संकल्पना राबविण्याचे ठरले आहे. रुग्णांना मानसिक आधार देण्याचे काम यातून होणार आहे.
दुर्धर रोगाने पिडीत रुग्ण अखेरच्या काळात वेदना सहन करत असतात. उपचार करण्यासारखे काही नसल्याने रुग्णालयात ठेवण्याचा खर्च परवडणारा नसतो, हे लक्षात घेऊन ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मानवतेच्या दृष्टीने हे अत्यंत स्वागतार्ह पाऊल आहे. नाशिकमध्ये रुग्णांसाठी प्रेमाने, तळमळीने संस्था अविरतपणे हे काम करत आहेत. ज्येष्ठ नागरीक, दारीद्रयाने पिडीत अनेक रुग्णांना मदतीची गरज असते. त्यांना अशा संस्था मदतीचा हात देतात. संवेदनशाीलता व माणूसकीच्या भावनेने हे काम करतात. 
दिंडोरी रोड येथे क्षयरोगांच्या रुग्णांसाठी टीबी सॅनीटोरीयमद्वारे सेवा पुरविली जाते. रुग्णाला उपचाराबरोबरच संवादाची गरज असते आणि त्यातून त्याची इच्छाशक्ती प्रबळ होत असते. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे व्रत घेणार्‍या संस्था समाजासाठी आदर्श आहेत.

अशा संस्थांची संख्या वाढण्याची गरज असून त्यातून आपुलकीचा, माणूसकीचा कृतीशील संदेश जनतेपर्यंत पोहोचेल.   


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Wednesday, 11 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

‘नाशिक पर्यटन डेस्टीनेशन’


नाशिक शहर पर्यंटनस्थळ म्हणून विकसित होत असतांना येथील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्यासाठी तसेच जपणूक करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. या वास्तूंचे, स्थळांचे वेगळेपण अजून टिकून आहे. पर्यटनातून मिळणार्‍या आर्थिक उत्पन्नाचा उपयोग इथे नवनवीन आधुनिक सुविधा देण्याकरीता तसेच सौंदर्य जपण्यासाठी करण्यात यावा. त्र्यंबकेश्वर परिसर काळाराम मंदिर, सीतागुंफा, श्री कपालेश्वर मंदिर ही काही धार्मिक स्थळे जगभर प्रसिद्ध आहेत. पांडवलेणी, दादासाहेब फाळके स्मारक या काही आणखी वास्तू आहेत.
नाशिकचा सांस्कृतिक, धार्मिक वारसा आजच्या तरूणांनी जपायला हवा व त्यासाठी तरूणांनी पुढाकार घ्यायला हवा. या सार्‍या वास्तू आपला ऐतिहासिक ठेवा आहे. आपल्या शहराची शान आहे. ही स्थळे स्वच्छ, सुंंदर, पवित्र राहतील यासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे.
नाशिक हे ‘टुरीझम डेस्टीनेशन’ झाले आहे. स्थापत्य व खाद्यपदार्थांचे वेगळेपण तसेच चालीरीतींमुळे नाशिक स्वतंत्र ओळख टिकवून आहे. एक समृद्ध आणि संपन्न वारसाचे गोंदण लावून हे शहर दिमाखात उभे आहे.

नाशिकच्या पर्यटनाचे ब्रँडींग होण्यासाठी पर्यटन विषयक काम करणार्‍या संस्था, शासन, जनता यांनी एकत्र यावे व नाशिकच्या लौकीकात भर टाकून नवी ओळख करून द्यावी.  



(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Tuesday, 10 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

‘नाशिकचे कलासंचित जपण्यासाठी’


नाशिक कला शिक्षकांच्या ‘व्हीजन’ नावाच्या विभागीय मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून जाण्याचा योग आला. यात नाशिक, धुळे परिसरातील कलाशिक्षकांचा सहभाग होता. कलेचा प्रसार कलाशिक्षणातील अडचणी, कलाशिक्षणाचे अभ्यासक्रम यावर हे शिक्षक काम करतात. यावेळी उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
कलेची निर्मिती अविष्कार करणे ही मुलभूत गोष्ट आहे. त्यासाठी साधना आणि मेहनत महत्वाची आहे. यावेळी कलाशिक्षकांच्या अडीअडचणी व त्यांचे प्रश्‍न यांवर वक्त्यांनी आपले विचार  व्यक्त केले.
समाजात आज कलेविषयी तितकीशी जागरूकता आलेली नाही. दर्जेदार कलाकृतींविषयी रसिकही अनाभिज्ञ आहेत. नाशिकमध्ये चित्रकार शिवाजी तुपे वा.गो. कुलकर्णी, आनंद सोनार, अशोक ढिवरे, संजय साबळे अशा अनेक नव्या जुन्या चित्रकारांनी चित्रकलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिला. आज शहरात कला, महाविद्यालये आहेत त्यातून अनेक चांगले चित्रकार  तयार होत आहेत. आणि आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत आहेत. या कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ’आर्ट गॅलरी’ सुरु करण्याची गरज आहे.
त्यात नव्या चित्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रात्याक्षिके, कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात. भारतीय व जागतिक कलाकृतींची माहिती व्हावी यासाठी एक म्युझियम (कला संग्रहालय) नाशिकमध्ये उभे करण्यास जनतेने पुढाकार घ्यावा. 

त्याचबरोबर कलाकृतींचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी लघुपट व कॉफी टेबल बुक करावेत त्यातून पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. नाशिकचे कलासंचित जपण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे..!



(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Monday, 9 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

‘नाशिकच्या रंगकर्मींचा प्रयास’


‘नम्रता कलाविष्कार’ या नाट्यसंस्थेच्या कलाकारांना व तंत्रज्ञांचा माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला निमित्त होते महाराष्ट्र कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत ‘प्रयास’ या नाटकाला द्वितीय क्रमांंकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. या निमित्ताने ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनाही गौरविण्यात आले. एकंदर या कार्यक्रमात नाटक आणि कलावंतांची नाट्यसाधना यावर विचारमंथनही झाले.
मी यात माझा नाटकाशी आलेला संबंध यावर मनोगत व्यक्त केले. कलाकार रंगमंचावर जी कला सादर करतो. त्यातून तो जीवनाशी संबंधित काहीतरी घटना सांगत असतो. तेच खरं तर त्याला जीवनातलं सत्य मांडायचं असतं. आणि तो पोटतिडकीने मांडत असतो. नाटक म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. असंख्य अनुभवांनी व्यापलेलं अवकाश आहे. ते समजून घेणं म्हणजेच ’नाट्य अवकाश’ होय. आजच्या टी.व्ही. चॅनेल्सच्या जमान्यात अनेक कलाकार येतात व मेहनत व कष्ट न करता या क्षेत्रातून दूर जातात. कलाकारांनी आवाज, उच्चार, शब्दोउच्चार, नाटकाचा विषय यावर अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर रंगभूमीची परंपरा समजून घेतली पाहिजे. ज्येष्ठ रंगकर्मीच्या प्रवास  जाणून घेतला पाहिजे. 

अभिनेते उपेंद्र दाते इतकी वर्ष नाट्य क्षेत्रात राहूनही त्यांना नवे शिकण्याची आस आहे, असे मनोगतात सांगितले. यावरूनच त्यांची बांधिलकी लक्षात येते. तोच विचार तरूण रंगकर्मींनी जोपासायला हवा. त्यातुन नाशिक रंगभुमीचे भविष्य उज्वल होईल. 




(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Friday, 6 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

‘प्रदुषणमुक्त नाशिकसाठी सायकल चालवा’


नाशिक शहराची वाहतुक व्यवस्था वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे बर्‍याचदा कठीण होत आहे. त्यातून रहदारीचे प्रश्‍न निर्माण होतात व प्रदूषणाचाही प्रश्‍न निर्माण होत असतो. यावर उपाय म्हणून पर्यावरण संतुलन रहावे, यासाठी नाशिक महापालिकेने यावर आरोग्यवर्धक पाऊल उचलले आहे.
सायकलचा वापर जास्तीत जास्त जनतेने करावा, यासाठी जाणीवजागृती करण्यासाठी  अभिनव प्रयोग करण्याचे ठरवले आहे. महानगरपालिका व फुलोरा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत ही शहराच्या सर्वच भागात टप्प्याटप्प्याने सुरु होणार आहे.
या योजनेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एका ठिकाणाहून नेलेली सायकल दुसर्‍या ठिकाणी जमा करता येईल. यासाठी भाडे नाममात्र आकारले जाईल. दुसर्‍या टप्प्यात एक हजार सायकली उपलब्ध करण्यात येणार आहेत.
जनतेचे आरोग्य निरोगी राहण्याबरोबरच नाशिकची हवा शुद्ध रहावी. आनंददायी रहावी  यासाठी अशाप्रकारचे उपक्रम कृतीशील आहेत. कालांतराने सायकल ट्रॅकचीही उभारणी होणार असून, त्यामुळे सायकलची आवड असणार्‍यांसाठीच व्यासपीठच ठरणार आहे.

ओझोनचा थर कमी झाल्याने जागतिक तापमान वाढत आहे. वृक्षारोपण कमी होत आहे. औद्योगिक परिसरातील प्रदूषण, रसायनयुक्त पाणी यामुळे शुद्ध हवा दुरापस्त झाली आहे. यासाठीच ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ असा नारा आता नाशिकमध्ये आपल्याला ऐकू येईल. शरीर तंदुरूस्त राहण्यासाठी सायकलींग हा उत्तम उपाय असल्याने संशोधनात सिद्ध झाले आहे. त्यासाठीच सर्वांनी संघटीत होऊन जनजागृतीपर प्रबोधनपर जाणीवेतून ‘सायकल चालवा’ हा संदेश समाजात न्यावा व स्मार्ट सिटीच्या विकासात हातभार लावावा...




(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Thursday, 5 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...


TOGETHER FOR NASHIK
‘हरीत नाशिक’

नाशिकचे पर्यावरण संतुलन उत्तम रहावे. हवा शुद्ध खेळती रहावी. प्रदुषणमुक्त नाशिक व्हावे, यासाठी अनेक पर्यावरण प्रेमी संस्था काम करत असतात. याचाच भाग म्हणून नाशिकमध्ये हरीतपट्टा मोठ्या प्रमाणावर उभा रहावा, यासाठी फाशीचा डोंगर परिसरातील माळरानावर पाच वर्षापूर्वी ‘देवराई’ संस्थेच्या पर्यावरण प्रेमींनी झाडे लावण्यास सुरुवात केली या ठिकाणी शंभरहून अधिक प्रकारची झाडे असून, त्यांचे संवर्धन व जोपासना चांगल्या प्रकारे होत आहे. जनतेमध्ये यामुळे पर्यावरणाविषयी जोपासना करण्याची आवड निर्माण झाली आहे. आजूबाजूच्या रहिवाशी यांनीही यात सहभाग नोंदवला आहे.
पक्ष्यांसाठी घरटी बनवण्यात आली असून, एक जैवविविधतेचा प्रत्यक्ष अनुभव इथे प्रत्ययास येतो आहे. इथले आणखी एक वैशिष्ट म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील  आदिवासींच्या सहकार्याने रानवेली फुलणार आहेत.  तोरणवेल, पळस, माळकांगणी, शतावरी ह्या काही जाती आहेत. लोकसहभागातून उभे राहणारे देवराई, सारखे प्रकल्प समाजात जागृती निर्माण करणारे आहेत.

नाशिक बाहेर अनेक ठिकाणी पडीक जमिनी आहेत. त्या ठिकाणी वृक्षारोपण केल्यास हरीत-नाशिक साकारण्यास वेळ लागणार नाही. उंच वाढणारी झाडे लावल्यास शहरास सौंदर्यही प्राप्त होईल. प्रदुषणमुक्त नाशिकसाठी  वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करूया...


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Tuesday, 3 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

‘नाशिकचे कचरा व्यवस्थापन’

  नाशिकमध्ये कचरा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होत आहे. घनकचर्‍याची विल्हेवाट योग्य लावली जात असल्याने प्रदुषणाच्या समस्या तशा कमी निर्माण होत आहेत. शहरांमधून रोज जमा होणारा कचरा खत, कांडी, कोळसा ‘प्लास्टीक कचर्‍यापासून ‘फर्नेस ऑईल’ तयार करणे अशा प्रकल्पांसाठी वापरला जात आहे.
नाशिकमध्ये कॉलनी-कॉलनीत घंटागाडीमार्फत कचरा जमा केला जातो आणि त्याचे संकलन करून खत निर्मिती प्रकल्पासाठी दिला जातो. कचरा निर्मुलनासाठी घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे. त्यामुळे नियंत्रण राखण्यात मदत होते.
‘स्मार्ट नाशिक’कडे वाटचाल करून असतांना शहराच्या आरोग्याचा प्रश्‍नही तितकाच महत्त्वाचा आहे. नाशिकची स्वच्छता ठेवणे ही प्रत्येक नागरीकाची जबाबदारी आहे. पूर्वी कचरा संकलन हे आडगांवनाका परिसरात होत होते. परंतू नागरी वस्ती वाढल्यानंतर विल्होळीला कचरा आगार हलवण्यात आले. सध्यातरी 60-70 टक्के कचर्‍याची विल्हेवाट लावली जाते. इतर शहरांपेक्षा नाशिक याबाबत अग्रेसर आहे. कचरा व्यवस्थापन करण्यासाठी लहान-लहान प्रकल्प उभे करून त्यातून खत निर्मिती प्रकल्प उभे राहू शकतात. उद्योगधंद्यांतून तयार होणारी मळी किंवा मिश्रण यात घातक रसायने असतात, ते नष्ट करण्याची सक्ती उद्योजकांवर हवी.

वैद्यकीय कामानंतर उरलेल्या कचर्‍याचे निर्जंतुकरण करून त्याची विल्हेवाट लावावी. नाशिकचे वाढते नागरीकरण व शुद्ध हवा, निरोगी आरोग्याचा समतोल राखण्यासाठी कचरा व्यवस्थापन महत्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Monday, 2 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

‘प्लास्टिकमुक्त नाशिक’

पर्यावरण संवर्धन व्हावे, यादृष्टीने प्लास्टीक बंदी हा विषय सध्या चर्चेत आहेत. प्लास्टिकची योग्य विल्हेवाट न लावल्याने एक मोठे संकट उभे राहिले आहे. केंद्रीय प्रदुषण मंडळाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 1.2 टन प्लास्टीकच्या उत्पादनांचा वापर होतो. त्यातून 950 टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. इतक्या प्रचंड प्रमाणात प्रदुषण करणार्‍या प्लास्टिकवर बंदी आणण्यासाठी शासन आणि संस्था पुढे सरसावल्या आहेत.
‘सुंदर नाशिक स्वच्छ नाशिक’ अशी संकल्पना घेऊन नाशिकची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु आहे. यानिमित्ताने नाशिकच्या सार्वजनिक स्वच्छतेचा विषय ऐरणीवर आला आहे. जनतेचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी यात जनतेचाच पुढाकार महत्वाचा आहे.
प्लास्टिकबंदी करण्यासाठी प्रथमतः विक्रीवर बंदी आणावी. व प्रबोधनात्मक जाणीवेतून मेळावे घ्यावेत. कागदापासून, कापडापासून टाकावू ते टिकावू पिशव्या तयार करण्याच्या मोफत कार्यशाळा घ्याव्यात. विविध मोहिमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून त्यांना प्लास्टिक बंदीचं महत्व सांगावे. प्लास्टिकमुक्ती यशस्वी करण्यासाठी केनिया देशाने बाजी मारली आहे.तेथील जनतेने व प्रशासनाने यात पुढाकार घेतला व प्रदुषण मुक्तीचा कृतीशील विचार दिला आहे.

प्लास्टिकचे वैज्ञानिकदृष्टया काय तोटे आहेत त्याचा आरोग्यावर, पर्यावरणावर निसर्गावर काय परिणाम होतो, हे सर्वांना कळले तर ‘प्लास्टिकमुक्त नाशिक’ होण्यास नक्की मदतच होईल.


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur