Saturday, 31 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

तंबाखूमुक्त नाशिक


तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहेत. भारतात तंबाखू खाणार्‍यांचे प्रमाण प्रौढ व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात आहे. ही सवय लहान मुले व तरूणांमध्ये वेगाने फैलावत आहे. त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. हे रोखण्यासाठी प्रबोधनात्मक जाणिवेतून नाशिकमध्ये ‘जॉईन द चेंज’ या अभिनव चळवळीची सुरूवात झाली आहे.
नाशिकच्या विकासात आरोग्याचेही तितकेच महत्त्व आहे. एच.सी.जी. मानवता हॉस्पिटलच्या सहकार्याने ‘तंबाखू मुक्त नाशिक’ हा उपक्रम घेण्यात आला आहे. तंबाखू विरोधात कायदा येऊनही अजून समाजात जाणीव व जागृती आलेली नाही. यासाठी सामाजिक संस्था व जनतेने पुढे येण्याची गरज आहे. तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्यात येऊनही काही प्रमाणात विक्री होत असते त्यांवर कडक निर्बंध रोखणे महत्त्वाचे ठरावे.
भारतात कर्करोगाचे वाढते प्रमाण बघता सर्वांना व्यसनांपासून दूर नेण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. तंबाखूचे व्यसन असलेले ऐंशी टक्के लोक हे अल्प उत्पन्न असलेल्या विकसनशील देशात आहेत. शाळा व महाविद्यालयांमध्ये तरूणांमध्ये व्यसनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. त्यासाठी तंबाखूमुक्त अभियानाची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे. तंबाखू सेवनासंदर्भात सर्वेक्षणानुसार 15 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील 35% व्यक्ती विविध माध्यमातून तंबाखुचे सेवन करतात. ग्रामीण व शहरी भागात याचे वाढते प्रमाण आहे.

पोस्टर प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य अशा उपक्रमांतून यांवर प्रबोधनात्मक विचार पोहोचू शकतो. तसेच व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरूणांचे समुपदेशन करून त्यातून त्यांना बाहेर काढता येऊ शकते. यासाठी कुटुंबाने, समाजाने जबाबदारीने पुढे यायला हवे. सर्वांच्या प्रयत्नांतून ‘तंबाखूमुक्त’ नाशिक होण्यास निश्‍चितच मदत होईल.

(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Friday, 30 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

नाशिकचे ‘एज्युकेशन हब’ व मुक्त शिक्षणाचा विचार


शिक्षणासारख्या गतीमानतेने बदलणार्‍या क्षेत्रात प्रयोगशीलता येत आहे. त्यातून नवनवीन शैक्षणिक संकल्पना प्रत्यक्षात येत आहेत. आधुनिक शिक्षणप्रणालीत बदलाचे फायदेही दिसून येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शालेय स्तरावरील मुक्त शिक्षण हा विषय सध्या चर्चेत आहे. या विषयाचा वेध घेण्यासाठी महाराष्ट्र टाईम्स नाशिकतर्फे विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात या विषयीच्या परिणाम व फायदे यांची चर्चा झाली.
झोपडपट्टी, कामगार वस्तीतील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे अनेक प्रश्‍न आहेत. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवे. यासाठी अनेक समाजसेवी संस्था काम करत आहेत. ‘मुक्त शिक्षण’ ही संकल्पना महत्त्वाची आहे. त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होईल. त्यांना शिक्षणाची संधी मिळेल. समाजातील निरक्षरतेचे प्रमाण घटवण्यासाठी याचा उपयोग होईल.
शिक्षणापासून वंचित घटकाला शिक्षणाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी हा महत्त्वाचा विचारआहे. संपन्न आणि समृद्ध व्यक्तीमत्व विकासासाठी शिक्षण हा प्रभावी घटक आहे.

पारंपारिक शिक्षणाचा आग्रह धरणार्‍या अनेकांना हा निर्णय धक्कादायक असला तरी शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी पूरक आहे. नाशिक आज ‘एज्युकेशन हब’ म्हणून नावारूपाला येत असतांना असे प्रयोग होणे ही काळाची गरज आहे. शिक्षणातून मिळणारा आत्मविश्‍वास आणि लवचिकता यांचा समन्वय साधून शिक्षणाचे सार्वत्रिकरण हा विचार रूजण्यास यामुळे निश्‍चितच मदत होणार आहे. या शिक्षणातील अभ्यासक्रमाची रचनाही वैविध्यपूर्ण असणार आहे. व्याप्ती, उद्दीष्टे, मूल्यमापन आदींशी निगडीत गोष्टी यामध्ये असतील. पारंपारिक शिक्षणातील आवश्यक संवाद आणि कौशल्य संपादित करून स्वतःचा व्यवसाय टाकण्याची क्षमता यात असेल. यातून बेरोजगारी कमी होण्यास निश्‍चितच मदत होणार आहे. नाशिकच्या शिक्षण क्षेत्राच्या विकासात अशा संकल्पना कक्षा रूंदावणार्‍या ठरणार आहेत. त्यासाठी नाशिकमधील शिक्षणक्षेत्रातील जाणकार तज्ज्ञांनी यावर विचारमंथन करावे. 


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Thursday, 29 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

‘भगवान महावीर अहिंसेचे मुर्तीमंत प्रतिक’


जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मुर्तीमंत प्रतिक होते. भगवान महावीर 28 वर्षाचे असतांना त्यांच्या आई वडीलांचा मृत्यू झाला. वयाच्या तीसाव्या वर्षी त्यांनी श्रामणी दीक्षा घेतली. त्यानंतर बहुतांश वेळ ते ध्यानात मग्न असत. काही दिवसांनी त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. त्यांनी बारा वर्षापर्यंत मौन पाळले होते. त्यानंतर भगवान महावीरांना केवल ज्ञान प्राप्त झाले. ज्ञानप्राप्तीनंतर जनकल्याणासाठी त्यांनी उपदेश सुरू केला. विचारांतून समाजाचे प्रबोधन होते. आणि त्यातून संपन्न आणि समृद्ध समाजाची निर्मिती होते यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
भगवान महावीरांनी प्रवचनातून अहिंसा सत्य अपरिग्रह, त्यांग, संयम, प्रेम, करूणा, शील, सदाचार यांवर समाजाला मार्गदर्शन केले. आणि त्याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. जीवन शुद्ध पाण्यासारखे असावे असे ते म्हणत. समता हेच जीवनाचे लक्ष्य असल्याचे महावीरांनी सांगितले. सत्य हेच खरे तत्त्व आहे व समाजहिताचा विचार करा हा महावीरांचा संदेश आहे. महावीर म्हणतात की, आपण क्षमा केल्यामुळे सर्व सजीवांना अभय देऊन त्यांच्या रक्षणाचा संकल्प केला पाहिजे. जेव्हा आपण संयम आणि विवेकाचे अनुसरण करतो तेव्हाच आत्मिक शांतीचा अनुभव घेऊ शकतो. 
सर्व सजीवांप्रती मैत्रीची भावना ठेवणे आपले कर्तव्य आहे. आपण बाहेर कुठेही हस्तक्षेप न केला आणि बाहेरील तत्वापासून विचलित न झाल्यास आत्मा शुद्ध होऊ शकतो. क्षमाभाव याचा मूलमंत्र आहे. भगवान महावीरांनी मन अहिंसक बनवण्यासाठी लोकांना तप, अहिंसा व साधना यांचा मार्ग दाखवून त्यांना सत्याप्रत पोहोचवले. मनावर विजय मिळवण्यासाठी क्रोधाला जिंकता आले पाहिजे. भगवान महावीरांनी आंतरीक गुणांच्या सामर्थ्यावर नैतिक धारणा व व्यावहारीक जीवन यांचा समतोल घडवून आणला. 

त्यामुळे लोकजीवनात सामाजिक एकोपा राहिला आहे. खर्‍या अर्थाने मानवतावादाकडे जाण्याचा मार्ग भगवान महावीरांनी आपल्याला दिला आहे. त्याची जोपासना करूया.

(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Wednesday, 28 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...



TOGETHER FOR NASHIK

‘नाशिकची वाहतुक सुरक्षा आणि प्रशिक्षण...’


नाशिकमधील वाहतूकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सामाजिक संस्था प्रबोधन करत असतात व मार्गदर्शन करत असतात. यातीलच एक जनतेला वाहतुकीच्या नियमांची कृतीशील जाणीव करून देण्यासाठी चिल्ड्रन ट्रॉफिक पार्क, सामाजिक जाणीवेतून काम करत आहे. त्यांनी एक अभिनव उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. तो म्हणजे दुचाकी चालकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा. अशा प्रकारे प्रशिक्षण देण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम आहे. चिल्ड्रन ट्रॉफिक पार्क व  हिरो मोटार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे.
या उपक्रमात प्रामुख्याने तरूण-तरूणींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीने वाहन चालवण्याचे नेमके फायदे यातून मान्यवर सांगणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत. आजकाल 70 टक्याहून अधिक अपघात हे दुचाकी चालकांकडून होतात आणि यात सर्वाधिक प्रमाण दुचाकी चालवणार्‍या तरूणांचे आहे. यातून सुरक्षित वाहन चालवण्याचे फायदे त्यांना कळणार आहेत.  काही दिवसांपूर्वी आलेल्या आकडेवारीनुसार वाहतूक नियमांचे पालन व रस्ता सुरक्षितेत नाशिक महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. 
नाशिकमधील वाढती लोकसंख्या आणि रस्ते रूंदीकरणाचा अभाव यामुळे वाहतूकीत अडचणी येतात. त्यासाठी पोलीसांतर्फे विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जातात व त्यातून जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळतो.

शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वाढती संख्या व शालेय बसेसचा जास्त वापर यामुळे वेळेत आणि सुरक्षित वाहतूक होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम दिशादर्शक ठरावेत आणि वाहतुक सुरक्षितेविषयी नवी जाणिव निर्माण करणारेही ठरावेत.



(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Tuesday, 27 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

‘नाशिकची रंगभूमी सशक्त व्हावी म्हणून...’


27 मार्च जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. 1961 मध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटयुटने याची सुरुवात केली. जीवनातले प्रश्‍न पोटतिडकीने प्रभावीपणे मांडण्यासाठी रंगभूमी हे प्रभावी माध्यम आहे. वर्तमानाला अविष्कृत करणारे हे सामर्थ्यशाली माध्यम आहे.
मराठी, हिंदी रंगभूमीच्या विकासात नाशिककर कलावंतांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. समांतर प्रायोगिक व्यावसायिक रंगभूमीवर वैविध्यपूर्ण नाटकांनी आपली मोहर उमटवली आहे. नाशिकच्या रंगकर्मींमध्ये टॅलेन्ट आहे. त्यांना भारतीय व आंतरराष्ट्रीय रंगभूमीवर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
प्रायोगिक रंगभूमीसाठी नाशिकमध्ये नवे प्रयोग सादर होण्याची गरज आहे. राज्य नाट्य स्पर्धेत नाशिककर कलावंत अनेक महत्वाची नाटके सादर करतात त्यातील पहिल्या पाच नाटकांचा  महोत्सव सादर व्हावा जेणेकरून कलावंतांना आत्मविश्‍वास मिळेल. तसेच या नाटकांवर परिसंंवादात्मक चर्चा व्हावी व नाटकाच्या लेखन, तांत्रिक माध्यमे यासंबंधी मार्गदर्शन  व्हावे.
हौशी तरूण रंगकर्मींसाठी संस्थांनी मोफत रंगमंच उपलब्ध करून द्यावा व त्यांना शासनाचे अनुदान मिळवून देण्यासाठी निश्‍चित प्रयत्न करावेत.  नाट्य परिषदेमार्फत कलावंत, लेखक यांच्यासाठी मोफत कार्यशाळा घ्याव्यात. जेणेकरून त्यांना योग्य दिशा मिळेल.
रसिकांची अभिरूची घडवण्यासाठी आशयप्रधान नाटके सातत्याने सादर व्हावीत व त्यासाठी ‘लोकरंगमंच’ सारखे उपक्रम सुरु व्हावेत.
‘बालरंगभूमीच्या’ विकासासाठी अजूनही अनास्था आहे. त्यासाठी शाळांमध्ये जाऊन रंगकर्मीनी निवडक विद्यार्थ्यांना घेऊन बालनाट्ये बसवून नाट्यविषयक जाणीव निर्माण करावी मुलांच्या सृजनशक्तीला, अष्टपैलूत्वाला याचा उपयोग होईल.

नाशिकच्या रंगभूमीला अशा प्रयत्नातून नवे भान व उर्जितावस्था प्राप्त होईल व रंगभूमी सशक्त होईल.



(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Monday, 26 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

‘चित्रपट उद्योगासाठी संपन्न नाशिक...’

नाशकात नुकताच 10 वा नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल (निफ 2018) संपन्न झाला. यात चित्रपट क्षेत्रातील मान्यवर लेखक, तंत्रज्ञ, अभिनेते उपस्थित होते. यात चित्रपटविषयक विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले व त्यावर विचारमंथनही झाले.
चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांची नाशिक ही जन्मभूमी आज जगात चित्रपट क्षेत्रात जे बदल झाले आहेत.  त्याची रूजवात दादासाहेबांनी केली. समाज प्रबोधनासाठी प्रश्‍न मांडण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे, हे त्यांनी दाखवले आणि प्रत्यक्षात आणले.
नाशिकच्या कला-संस्कृतीच्या विकासात अनेक थोर कलावंतांनी योगदान दिले आहे. कलाक्षेत्रात अभिरूची घडवण्याचे काम केले आहे.
दादासाहेब फाळके यांच्या समृद्ध नाशिकमधील अनेक कलावंत कलेचा हा वारसा जपत आहेत. मराठी, हिंदी चित्रपटात त्यांनी नावलौकीक संपादन केला आहे. आशयप्रधान व तांत्रिक अंगाने समृद्ध सिनेमा नाशिककरांनी निर्माण केला आहे. व योगदानाबद्दल त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे.
चित्रपट निर्मितीसाठी शासनाने दादासाहेब फाळके चित्रसृष्टी तयार करण्यासंदर्भात चर्चा केली आहे व त्यासाठी पावले उचलली आहेत. त्याला मूर्तरूप येईलच.
आधुनिक चित्रपटनगरी नाशकात स्थापन झाल्यास नवनवीन चित्रपटनिर्मिती होण्यास मदत होईल. येथील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळेल व सिनेमासंबंधी तांत्रिक माध्यमांविषयी मार्गदर्शन करणार्‍या संस्था निर्माण होतील. त्यातून नवी पिढी या माध्यमांकडे आकर्षित होईल. अनेक निर्माते चित्रपट निर्मितीत गुंतवणूक करतील व त्यातून पर्यटनस्थळ विकसीत होण्यास मदत होईल.

नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरातील स्थळे शुटींगसाठी विकसित करता येतील व त्यातून हॉटेल रिसोर्टचा  व्यवसाय वाढीस लागण्यास उपयुक्त ठरेल. अनेक उमेदीने सकस लिहिणारे लेखक नाशिकमध्ये आहेत. त्यांच्यासाठी चित्रपटासाठी पटकथा, गीतलेखन, कार्यशाळांचे आयोजन  केल्यास आशयप्रधान सिनेमांसाठी पूरक ठरणार आहे. म्हणूनच मुंबईला चित्रपट उद्योगाला पर्याय नाशिक निश्‍चित ठरू शकेल.


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Saturday, 24 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

‘दिव्यांगांचे अनोखे साहित्य सम्मेलन’

7वे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य सम्मेलन विश्वास लॉन्स येथे आयोजित करण्यात आले आहे. या सम्मेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली आहे. दिव्यांग बांधवांच्या  कला-साहित्य विश्वाच्या कक्षा रूंदावणारे हे संमेलन आहे. दिव्यांग बांधवांनी अनेक दर्जेदार कवितासंग्रह, कथासंग्रह, ललितलेखन साहित्य विश्वाला देऊन साहित्यविश्व समृद्ध केले आहे.
अपंग साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झालेल्या कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ या अपंग महिला समीक्षा अनुवाद, कथा, स्तंभलेखनात फार मोठे काम करत आहे. कवी प्रा. अशोक थोरात, कवी यशवंत पुलाटे, गझलकार डॉ. श्रीकृष्ण राऊत, दिवंगत गझलकार नाना बेरगुडे, अशी असंख्य नावे आहेत, ज्याचे साहित्य कर्तृत्व मराठी साहित्य विश्वात फार मोठे आहे.
अपंगत्त्व आणि अपंगत्त्वाकडं पाहण्याचा दृष्टिकोन याबाबत समाजामध्ये सजगता निर्माण करण्यात विविध प्रकारची माध्यमं आणि साहित्य महत्त्त्वपूर्ण योगदान देऊ शकतं. प्रत्यक्षात या अनुषंगाने काही घडतं आहे का? घडत असेल तर ते योग्य प्रकारे घडत आहे का? अपंगांचे साहित्य म्हणून साहित्याचा वेगळा प्रवाह मानणं, त्याची वेगळी संमेलने असणं योग्य आहे का? याबाबत विचारमंथन होणे ही काळाची गरज आहे.
भाषा व अनुभवाच्या मिश्रणातून दमदार अभिव्यक्ती निर्माण होते. दिव्यांग साहित्य संमेलनातून नव्या जाणिवांचे, भाषिक अवकाशाचे चित्र दिसते आहे. आपल्या लेखनातून समाजात आनंद निर्माण करा, नवा विचार द्या. तेच साहित्य निर्मितीचे खरे मूल्य आहे. ह्या मूल्यांची जोपासना दिव्यांग करत असतात.

मराठी साहित्यांचे प्रतिनिधीत्व करणारे अस्सल प्रतिभेचे लेखक, कवी, दिव्यांग साहित्य संमेलनातून आले आहेत. मनाच्या जाणिवेतून आलेला अविष्कार वास्तवाची जाणीव करून देणार असतो. ते सारं यांच्या लेखनात आलं आहे. भारतीय नव्हे तर जागतिक पातळीवर दिव्यांगांच्या साहित्यकृती आदर्श आहेत.


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur



Friday, 23 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK

‘नाशिक घडविण्यासाठी आपण सारे एकत्र येऊ...’

‘नाशिक सिटीझन फोरम’तर्फे नाशिकच्या विविध क्षेत्राच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्योग-व्यापारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात नाशिकची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असतांना काही मुद्दयांवर चर्चा झाली. यात सर्वसामान्य नागरिकांनी जबाबदारी म्हणून पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे नमुद करण्यात आले. प्रामुख्याने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वयंशिस्त बाळगणे महत्वाचे आहे. कचरा घंटागाडीत टाकणे, प्रदुषण रोखणे इत्यादी बाबी होत.
गोदावरी स्वच्छता अभियानात नागरिकांनी कचरा न होऊ देण्यासाठी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. गोदेचे सौंदर्यं पावित्र्य जपण्यासाठी सामाजिक हित म्हणून बघावे. गोदावरीचे सौंदर्य अबाधित राहील याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. नाशिक हे पर्यटनस्थळ असल्याने त्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळत असते.
तोच धागा घेऊन गोदाकिनारी परिसरात थ्री स्टार हॉटेल्स रिसोर्टची निर्मितीही होऊ शकते. यासंदर्भात उपस्थित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. नाशिकच्या सौंदर्यात नीटनेटकेपण आणण्यात, अतिक्रमणमुक्त करण्यावर सूचना मांडण्यात आल्या. नाशिकची विकासात्मक वाटचालही एकत्रीकरणातून विचारमंथनातून झाल्यास नाशिकचे नवे रूप साकारण्यास निश्‍चितच मदतच होणार आहे.

नाशिक आज ‘एज्युकेशनल हब’ म्हणून नावारूपास येत आहे. अनेक महत्वाच्या शिक्षणसंस्था, अभिनत विद्यापीठे स्थापन झाली आहेत. याचबरोबरच कामगार वस्तीतील झोपडपट्टीतील मुलामुलींना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी निश्‍चितच प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या शाळा कंपन्यांनी दत्तक घेणे, असे काही उपाय आहेत. सर्वांपर्यंत शिक्षणाचा विचारही यातून पोहोचण्यास मदत होईल. म्हणूनच नाशिकसाठी आपण सारे एकत्र येऊ.


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Thursday, 22 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

‘नाशिकची वाहतूक आणि जनप्रबोधन’

राज्यातील पोलिस आयुक्तालय हद्दीतील रस्ता अपघातांचा अहवाल नुकताच मुंबई वाहतुक शाखेच्या अतिरिक्त आयुक्तांनी प्रसिद्ध केला असून त्यात नाशिक आयुक्तालय क्षेत्रातील अपघातांच्या संख्येत अनेक शहरांच्या तुलनेत गेल्या वर्षापेक्षा 39 टक्क्यांनी घट झाली आहे. नाशिक पोलिसांनी राबवलेली हेल्मेट सक्ती, जनजागृती उपक्रम आणि त्यात नाशिककरांचा सहभाग यामुळे हे शक्य झाले आहे. नाशिकमध्ये 2017 मध्ये 158 अपघातात 171 जणांचा मृत्यु झाला होता. 2016 मध्ये 1031 अपघातात 213 जणांना जीव गमवावा लागला होता.
अपघात रोखण्यासाठी प्रबोधनासाठी शाळा, महाविद्यालये, औद्योगिक वसाहतीमध्ये जाऊन पोलिस अधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले.  शाळांमध्ये ’छोटा पोलीस’ सोमवारी ’नो हॉर्न झेब्रा क्रॉसिंग’, हेल्मेट न वापरणार्‍याला गुलाबपुष्प देणे असे अभिनव उपक्रम राबविले व त्याला जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिला. पोलिस हा जनतेचा मित्र असतो.
जनतेला सोबत घेऊन विश्वासार्हता निर्माण करण्याचे काम पोलिसांनी केले आहे. हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे. वाहतुक सुरक्षेसाठी  ङ्कनाशिक फर्स्टङ्ख या संस्थेनेही यासाठी जनप्रबोधन चळवळ उभारली आहे. त्यासाठी नाशिक पोलिस, प्रादेशिक परिवहन यांचे सहकार्य लाभले आहे. या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांबरोबरच 18 ते 25  वयोगटातील वाहन चालकांना वाहतुकीसंदर्भात प्रशिक्षण दिले जाते. तसेच रिक्षा, बस व विद्यार्थी वाहतुक करणार्‍या बस चालकांसाठी प्रशिक्षण वर्ग व अभ्यासक्रम राबवले जातात.
नाशिक शहरातील रस्त्यांचे रूंदीकरण, पार्कींगची सुविधा, शहर बससेवा यांचा नव्याने अभ्यास करून उपाययोजना तज्ज्ञांनी कराव्यात. तसेच नवा वाहतुक आराखडा तयार करण्यासाठी नागरीकांनी आपल्या सूचना मांडाव्यात. जेणेकरून सुरक्षित वाहतुकीचा नवा विचार रूजेल.

नाशिक शहराचा वाढता विस्तार बघता वाहतुकीचे नियोजन करणेही जिकरीचे झाले आहे. त्यात सामाजिक जागृतीतून नवी जाणीव नागरिकांमध्ये निर्माण होत आहे, ही दिलासा देणारी गोष्ट आहे. त्यातून नाशिकची ओळख सुसंस्कृत होण्यास व आदर्श शहरासाठी पूरकच ठरणार आहे.



(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Wednesday, 21 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

‘प्रतिभावंत नाटककार वसंतराव कानेटकर’

मराठी व हिंदी रंगभूमीला, चित्रपटाला नवा आयाम व नाट्यभाषा देणारे नाशिकचे भुमिपुत्र थोर नाटककार वसंतराव कानेटकर यांची आज 98 वी जयंती. रायगडाला जेव्हा जाग येते, वेड्याचे घर उन्हात, हिमालयाची सावली, प्रेमा तुझा रंग कसा?, अश्रृंची झाली फुले, अशी एकाहून एक सरस नाटके त्यांनी रंगभूमीला बहाल केली. व्यावसायिक, समांतर, प्रायोगिक रंगभूमीला नवी ओळख दिली. मराठी प्रेक्षक नाटकाकडे वळविण्यात कानेटकरांचे मोठे योगदान आहे.
नाशिकच्या एच.पी.टी. महाविद्यालयात इंग्रजीचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून कानेटकरांचा लौकीक होता. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी लेखनाची, वाचनाची गोडी लावली. त्यांनी कथा, कादंबरी, लेखनही केले पण खरी ओळख निर्माण केली ती नाटककार म्हणूनच.
नाटक कौशल्यावर उत्तम पकड, नाट्य पकडण्याचे उत्तम कौशल्य, नाटकातील नाट्य घडविण्याची शैली, उत्कटता व अलंकारिक भाषेचा प्रभावी वापर त्यांनी केला. आणि मराठी रंगभूमीला श्रीमंती बहाल केली. मराठीतील सन्मानीय विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, इतिहासकार यांच्या कार्यावर कानेटकरांनी नाटके लिहिली.
त्यात इतिहासाचार्य वि.का. राजवाडे, बाबा आमटे, हिराबाई पेडणेकर, महर्षी कर्वे अशा व्यक्तीमत्वांचा समावेश आहे.
माझे ज्येष्ठ बंधू राजा ठाकूर यांच्या ‘एकदा काय झालं’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी  प्रमुख अतिथी म्हणून कानेटकरांना विनंती केली. त्या दिवशी नेमका गुढीपाडवा होता. व कानेटकरांचा पुर्वनियोजित कार्यक्रम ठरलेला होता. परंतू राजाभाऊंनी त्यांना गळ घातली आणि म्हणाले की तुम्ही तारीख द्याल तो गुढीपाडवा आणि लगेच कानेटकरांनी नजीकची तारीख दिली आणि शानदार प्रकाशन समारंभ पार पडला. हा स्नेह अनेक वर्ष ठाकूर परिवाराशी कानेटकरांचा टिकून होता.

मैत्री जपणे आणि टिकविणे ही त्यांची खासीयत होती. आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये (मंगळवार, 20 मार्च 2018)  वसंतरावांच्या उचित स्मारकाविषयी मत नोंदवण्यात आले आहे. त्यासाठी सर्व नाशिककरांनी एकत्र येऊन अशा महान नाटककाराच्या स्मृती जपाव्यात तसेच मौलिक नाट्यकृतींचा ठेवा जपावा.



(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Monday, 19 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...


‘लोककलांचे जतन’
महाराष्ट्र समृद्ध कला-परंपरांनी नटलेला आहे. अनेक पारंपारिक कला अजूनही टिकून आहेत. ग्रामीण भागात जत्रांच्या निमित्ताने उत्सवांच्या निमित्ताने कला सादर केल्या जातात. अनेक जाती-जमातींमध्ये लोकनृत्य ही स्वतंत्र ओळख आहे. कोळी नृत्य तसेच नंदुरबार, नाशिक, जव्हार, मोखाडा आदी परिसरातील लोकजीवनातील चालीरिती घटना यांचे अप्रतिम दर्शन लोकनृत्यातून केले जाते. यातून समाजजीवनाचा पैलू समोर येतो. विदर्भातही दंडार सारख्या नृत्यप्रकारातून विविध प्रसंग समोर येतात.
कोकणात काळी, चेऊली, बाल्या तसेच शेतकरी नृत्य, धनगरी नृत्य अशा विविध नृत्यातून लोकदर्शन होते.
सुरगाणा, पेठ या आदिवासी भागात कायमच लोकउत्सव साजरे होत असतात. सुगीच्या दिवसात जत्रा, मेळे  हे त्यांचे काही महत्वाचे उत्सव ते सादर करत असलेली नृत्येही वाद्यांच्या नावाने परिचित असतात.  तारफा, बोहाडा, ढोल नाच अशी नांवे होत.
आदिवासींमध्ये डोंगर माथ्यावर भाताची किंवा नागलीची लागवड केली जाते आणि पिकाचे चांगले उत्पन्न भरभरून आले की आनंदोत्सव म्हणून नृत्य केले जाते. होळीच्या सणाच्या दिवशीही नृत्याचा फेर धरला जातो. पारंपारिक सणांचे महत्व आणि त्यातून मिळणारा आनंद यांची सांगड अनेक लोककला, लोकपरंपरांमध्ये आहे.

वासुदेव, बहुरूपी, गोंधळ, पोतराज, वाघ्या-मुरळी, पोवाडा, भारूड, किर्तन अशा कला प्रकारांतून सांस्कृतिक, सामाजिक समन्वय साधला जातो. या कलांचे जतन व संवर्धन होण्यासाठी शालेय, महाविद्यालयीन पातळीवर महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, त्यातून नवी पिढीही याकडे आकर्षित होईल व प्रसार व प्रचार होण्यास तसेच लोककलांसाठी स्वतंत्र विद्यापीठही स्थापन्याची गरज आहे. 


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Saturday, 17 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

गुढीपाडव्यातून सामाजिक ऋणांची जपवणूक
गुढीपाडवा हिंदु पंचांगानुसार साडेतीन मुहुर्तापैकी एक आहे. नवीन व्यवसाय शुभकार्याची सुरुवात या दिवसापासून होते. मना-मनातील आनंदाला यातून उधाण येते. पावित्र्य आणि मंगलतेचा हा उत्सव असतो. नव्या जाणीवेतून नव्या आकांक्षा घेऊन गुढीपाडव्याच्या आनंद एकमेकांमध्ये वाटला जातो. राजा शालीवाहनाच्या विजयाचे प्रतिक म्हणून या सणाचे महत्व आहे. इतिहासाप्रमाणे गुढी भगवान रामाच्या विजयाचे आणि रावणाचा वध केल्यानंतर अयोध्येला परतल्यामुळे आनंदाचे प्रतिक आहे. चौदा वर्षाचा वनवास संपल्यानंतर रामाच्या राज्याभिषेकाच्यावेळी आनंद म्हणून साजरा केला गेलेला सण म्हणजे गुढीपाडवा...
सुख- समृद्धीचा अनोखा मिलाफ गुढीपाडव्याच्या निमित्ताने दारी येतो. पराक्रमाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गुढी उभारली जाते.
मानवी नात्यांना, समाजाला जोडण्याचे काम भारतीय सणांमध्ये आहे. विविध भाषा, संस्कृती, परंपरा यांची सांगड किती घट्ट आहे, याची प्रचितीच या आनंदोत्सवातून येते.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघणार्‍या स्वागतयात्रेतून सर्व समाजातील जाती-धर्माचे लोक एकत्र येतात आणि सांस्कृतिक व सामाजिक एकोपा राखण्याचा संदेश देतात. मनामनात चैतन्य फुलवण्याचे काम यातूनच होत असते. सकारात्मक, विधायक कार्याची प्रेरणा आणि त्याचा उपयोग करण्याची प्रेरणा यातून मिळत असते.
ढोलपथकातून ‘एक सुर एक ताल’ हा संदेश दिला जातो. सामाजिक सदभावनेतून जगाला प्रेम अर्पावे, ही प्रार्थना यातून केली जाते. चित्ररथ, नृत्य, लेझीम पथके, यांतून मराठी संस्कृतीचे दर्शन घडवले जाते. आजकाल स्वागतयात्रेतून पर्यावरण रक्षण, लेक वाचवा स्वच्छता अभियान, शिक्षण आरोग्य अशा विषयांवर संदेश दिला जातो. अशा कार्यक्रमातून समाजमन बदलण्यासाठी लोकसेवेचा नवा विचार दिला जातो व तोच विचार नव्या पिढीसाढी मोलाचा असतो.  


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअॅप : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Friday, 16 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

16 मार्च 
राष्ट्रीय लसीकरण दिवस
लहान मुलांना होणार्‍या आजारांविरोधात लढण्यासाठी लसीकरण हा महत्वाचा उपाय आहे. लसीकरण म्हणजे मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे होय. हा कमी खर्चातील उत्तम उपक्रम आहे. गेल्या पाच दशकात लहान  मुलांचा मृत्युदर  233 वरून 63 वर आला आहे (एक हजारापैकी). 
डिप्थेरिया, धर्नुवात, डांग्या खोकला, गोवर, हेपटायसीस ए, बी. कांजण्या अशा अनेक रोगांना लसीकरणामुळे प्रतिबंध करता येऊ शकतो.
आजकाल ग्रामिण भागातील लसीकरणाविषयी जनजागृती झाली असून, तेथील मुलांचे ही आरोग्य उत्तम राहण्यास मदतच झाली आहे. बाळाची काळजी व त्याचे आरोग्य याविषयीही पालकांमध्ये सजगता आली आहे. आदिवासी पाड्यांवर आरोग्य विभागातर्फे शिबीरांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळत असतो. लसीकरण आणि शिक्षण या गोष्टींची उपयुक्तता आजकाल समाजाला कळायला लागली आहे. हे या मोहीमेचे यश म्हणावे लागेल.
बाळाचा विकास म्हणजे त्याची बुद्धी भावनेचा विकास होय. सामाजिक पैलूंच्या अंगाने विचार करायचा तर त्याचा कौशल्य आणि कार्याचा विकास होय. या घडामोडी त्याच्या मानसिक आणि वर्तुणूकीशी निगडीत असतात त्यामुळे त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असते. क्षयरोग प्रतिबंधक लस, त्रिगुणी लस, अ जीवनसत्व डोस अशा अनेक लसींतून बाळाचे आरोग्य तंदुरूस्त राहण्यासाठी मदतच होते व त्याचा आरोग्यविषयक भविष्यकाळ निरोगी असतो.

समाजातील सर्वात शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी सर्वकष प्रयत्नांची गरज आहे. आणि त्यात समाजाने जाणीवपूर्वक पुढाकार घेणे उत्तम आरोग्यासाठी महत्वाचे ठरावे.


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअॅप : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

Thursday, 15 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

15 मार्च जागतिक ग्राहक दिन 
जागो ग्राहक जागो

आजच्या जागतिकीकरणाच्या काळात वाढत्या व्यवसायात ग्राहक हा अविभाज्य घटक झाला आहे. ग्राहक हा व्यवसायाचा एकंदर बाजारपेठेचा केंद्रबिंदु आहे. आर्थिक उलाढाल आणि बदल यांचा ग्राहक हा महत्वपूर्ण साक्षीदार असतो. ग्राहकाचं झालेलं समाधान हे व्यवसायाला, उत्पादनाला उभारी आणि बळ देणारे असते.
जागतिक ग्राहक चळवळीच्या इतिहासात विसाव्या शतकात महत्वपूर्ण घडामोडी झाल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत चाललेला व्यापार, औद्योगिक क्रांती आणि सुधारीत शिक्षण पद्धतीच्या प्रसारामुळे मुलभूत हक्कांची प्रत्येकाला जाणीव झाली. आणि ग्राहक  हक्कांविषयी प्रश्‍न निर्माण झाले. याचाच भाग म्हणून प्रथम 1980 मध्ये हाँगकाँग येथे ‘कायदा व ग्राहक’ या विषयावर  आंतरराष्ट्रीय परिसंवाद झाला. आणि त्यात ग्राहक हितावर चर्चा झाली. 
ग्राहकांच्या बाजारपेठेतील हक्कांसाठी अमेरीकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी ऐतिहासिक घोषणा केली होती. त्यामध्ये ग्राहकांना संरक्षणाचा अधिकार, माहिती मिळवण्याचा अधिकार, निवड करण्याचा अधिकार आणि ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेण्याचा अधिकार हे चार महत्वाचे अधिकार देण्यात आले.
संयुक्त राष्ट्र संघानेही ग्राहक चळवळीसाठी आठ हक्क दिले. सर्वांचा एकच हेतू आहे. शोषण मुक्ती ग्राहक यात कुठलाही भेद नाही. स्त्री- पुरुष, नोकरदार, मालक, आबालवृद्ध सगळेच ग्राहक हे सुत्र गुंफून ही चळवळ जगभर उभी राहिली आहे. 
भारतातील जुनी ग्राहक संस्था म्हणजे ‘‘कन्झ्युमर्स गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया’’ या संस्थेची स्थापना लीला जोग, कमला सोहोनी सारख्या अभ्यासू महिलांनी केली. ग्राहक चळवळीतही आज महिलांचे योगदान मोठ्या प्रमाणावर आहे.
‘कन्झ्युमर्स इंटरनॅशनल’ हे जगातील 115 देशातील 240 ग्राहक संघटनांचे फेडरेशन असून, त्याच्या महासंचालक हेलन मॅक्लम ब्रिटीश महिला आहे. जगातील अनेक देशांमध्ये महिलांच्या पुढाकारातून या चळवळीला वेग आला आहे.

ग्राहकांच्या प्रबोधनासाठी, जनजागृतीसाठी त्यांच्या हक्कासाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ग्राहक संरक्षण कायदा, जनलोकपाल अशा अधिकारातून ग्राहकांमध्ये साक्षरता आली आहे. ग्राहक हक्कांचे संरक्षण आणि त्याच्या तक्रारींचे सुलभतेने निवारण ही ग्राहकांची प्रथम गरज आहे.

(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअॅप : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur